शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

धार्मिक स्थळांबाबत सोमवारी निर्णय

By admin | Published: November 04, 2016 1:11 AM

महापालिका : पोलीस बंदोबस्त मागितला

नाशिक : महापालिकेने शहरातील ८४ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्यानंतर आता कारवाईच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून, येत्या सोमवारी (दि.७) पोलीस अधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत कारवाईची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, काही धार्मिक स्थळे स्वत:हून काढून घेण्याची तयारी काही विश्वस्तांनी दर्शविली असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार केलेल्या सर्वेक्षणात शहरात सन २००९ नंतरची ३१६ धार्मिक स्थळे अनधिकृत आढळून आली आहेत. त्यातील मनपाच्या हद्दीतील २८४ धार्मिक स्थळे असून, २१८ धार्मिक स्थळे ही मनपाच्या जागेवर आहेत. त्यामधील ८४ धार्मिक स्थळे ही रस्त्यांना अडथळा ठरणारी आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सदर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार, सहाही विभागातील ८४ धार्मिक स्थळांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत आणि येत्या ७ नोव्हेंबरपासून कारवाईचा इशारा दिलेला आहे. तत्पूर्वी, बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विभागनिहाय बैठका घेऊन संबंधिताना कारवाईची माहिती दिली आणि स्वत:हूनच धार्मिक स्थळे हटविण्याची सूचना केली. परंतु, महंतांसह राजकीय नेत्यांनी सदर धार्मिक स्थळे हटविण्यास विरोध दर्शवित फेरसर्वेक्षणाची मागणी केली आहे. त्यानुसार, महापालिकेने येत्या ७ नोव्हेंबरला पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलाविली असून, त्यावेळी कारवाईबाबतचे धोरण निश्चित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)