नाशिक : अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित, एक विशेष आणि त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीद्वारे आत्तापर्यंत सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असून, आता एटीकेटी मिळविणाºया विद्यार्थ्यांसह सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली आहे.प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात गुणवत्तानिहाय प्रवेशाची सधी दिल्यानंतर दुसºया टप्प्यात सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश खुले करण्यात आले होते. ही मुदत शनिवारी (दि.१४) संपल्यानंतर आता एटीकेटी मिळविणाºया विद्यार्थ्यांसह सर्वांना प्रवेशासाठी सोमवारी अखेरची मुदत देण्यात आली आहे.दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मागील तीन महिन्यांपासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. यात तीन नियमित, एक विशेष आणि प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य अशा पाच फेऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. सध्या प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीचा दुसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी २३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी आत्तापर्यंत १७हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी सोमवारी अखेरची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:34 AM