नाशिक : महापालिका शाळांमध्ये होणाºया प्रत्येक घटना-घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून, शिक्षण विभागाने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत ४२ शाळांमध्ये सुमारे ६.७५ लाख रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. उर्वरित शाळांमध्येही जसा निधी उपलब्ध होईल त्यानुसार, कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.महापालिकेच्या शाळा, इमारतींमध्ये रात्रीच्या वेळी अवैधरीत्या होणारा वावर आणि मुले गायब होण्याचे प्रकार, वाढत्या चोºया यामुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यासाठी मनपाच्या १२९ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यासाठी सर्व शिक्षा अभियानातील निधीचा वापर करण्यात आला. प्रति पाच हजार रुपये याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेºयांची खरेदी करण्यात येऊन गेल्या सहा महिन्यांत ४२ शाळांमध्ये कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बºयाच शाळांमध्ये प्रत्येकी तीन, तर काही शाळांमध्ये प्रत्येकी चार कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातील एक कॅमेरा मुख्याध्यापकांच्या दालनात बसविण्यात आलेला आहे, तर उर्वरित दोन कॅमेरे एक क्रीडांगणावर तर दुसरा व्हरांड्यात लावण्यात आलेला आहे. बºयाच शाळांमध्ये मुख्याध्यापक उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी होत्या याशिवाय, शिक्षकही वेळेवर हजर राहत नसल्याचे सांगितले जायचे. याशिवाय, शिक्षक-पालक यांच्यातही वादाचे प्रसंग घडायचे. आता या साºया घटना-घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून, त्यात एक महिन्याचा डेटा साठविण्याची क्षमता आहे. काही दिवसांपूर्वी अंबड येथील शाळेतील सीसीटीव्ही कॅमेºयाचीच चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. परंतु, पोलिसांच्या तपासानंतर कॅमेºयासह चोरही सापडला. आतापर्यंत ४२ शाळांमध्ये १३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, उर्वरित शाळांमध्येही निधी उपलब्धतेनुसार कॅमेरे बसविले जाणार आहेत. काही शाळांमध्ये कॅमेरे बसविण्यासाठी नगरसेवक निधीही प्राप्त झाला असल्याची माहिती नितीन उपासनी यांनी दिली.या शाळा सीसीटीव्ही नियंत्रणाखालीमहापालिका शिक्षण विभागाच्या केंद्र क्रमांक ११ मधील विद्यानिकेतन क्रमांक १३, शाळा क्रमांक १२६ ते १३४, केंद्र क्रमांक १३ मधील शाळा क्रमांक ७२ व ७३, शाळा क्रमांक २८, ३१, १०२, १००, केंद्र क्रमांक ६ मधील विद्या निकेतन क्रमांक ८, शाळा क्रमांक ९६, ७४, ९५, ४, केंद्र क्रमांक ७ मधील विद्यानिकेतन शाळा क्रमांक ११, शाळा क्रमांक ५३, ४८, ६८,१०५, केंद्र क्रमांक ९ मधील शाळा क्रमांक ११०, विद्यानिकेतन क्रमांक ५, शाळा क्रमांक १२२, शाळा क्रमांक १०, केंद्र क्रमांक २१ मधील शाळा क्रमांक २२, ७५, ८५, केंद्र क्रमांक १६ मधील शाळा क्रमांक ९७, ८४, ८३, ८२, १९, ९०, केंद्र क्रमांक ११९ व १२० या शाळा आता सीसीटीव्ही कॅमेºयांच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत.
महापालिकांच्या शाळांवर सीसीटीव्हीची नजर सुरक्षिततेसाठी उपाययोजना : ४२ शाळांमध्ये बसवले कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:18 AM
नाशिक : महापालिका शाळांमध्ये होणाºया प्रत्येक घटना-घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.
ठळक मुद्देसुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण सर्व शिक्षा अभियानातील निधीचा वापर