मानोरी : येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांनी तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे मंगळवारी (दि.१३) भेट दिली. यावेळी दलित वस्तीमध्ये नव्याने करण्यात आलेल्या कॉँक्रीट रस्त्याची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देखील भेट देऊन वर्ग खोल्यांची पाहणी केली.विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबद्दल शिक्षकाकडून माहिती जाणून घेतली. तसेच गावात पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे? पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोठून होता? याबाबत माहिती घेतली. यावेळी ३८ गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावाला पाणी पुरवठा होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.यावेळी येवला पंचायत समितीचे गटविस्तार अधिकारी आहिरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजू सानप, ग्रामपंचायत शिपाई तुकाराम शेळके, अनंता आहेर, संदीप वावधाने, दत्तात्रय साळवे, अमोल शेळके, सुनील साळवे, विकास बोराडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गटविकास अधिकाऱ्यांनी केली मानोरीतील कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:01 PM
मानोरी : येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांनी तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे मंगळवारी (दि.१३) भेट दिली. यावेळी दलित वस्तीमध्ये नव्याने करण्यात आलेल्या कॉँक्रीट रस्त्याची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देखील भेट देऊन वर्ग खोल्यांची पाहणी केली.
ठळक मुद्दे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोठून होता? याबाबत माहिती घेतली.