शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

मान्सून आला... आपत्ती टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:39 AM

दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाºयामुळे शेकडो घरांचे पत्रे उडाले, तर वीज कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला.

नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाºयामुळे शेकडो घरांचे पत्रे उडाले, तर वीज कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला. ठिकठिकाणी झाडे व फांद्या उन्मळून पडल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास बराच कालावधी लोटला. दरवर्षी पावसाळ्यात नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण होतो. ही आपत्ती नेमकी कधी व कशी येईल हे कोणी सांगू शकत नाही, तसेच ती थोपवणेही कोणाला शक्य नाही. मात्र अशी आपत्ती आली किंवा येणार असेल तर फार फार तर जीवित व वित्तहानी कशी टाळता येईल, त्याबाबत उपाययोजना करणे मानवाला शक्य आहे. यंदा मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने सलामी देत भविष्याची चुणूक दाखविली आहे. पाऊस म्हटला की वादळी वारा, वीज कोसळणे, नदी, नाल्यांना महापूर येणे या नैसर्गिक आपत्तीच्या संभाव्य घटना घडू शकतात. त्यापासून बचाव करणे व आपत्तीत सापडलेल्यांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत काही खबरदारीच्या उपाययोजना सुचविण्यात येऊन विविध यंत्रणांची जबाबदारीही निश्चित करण्यात आलेली आहे. अर्थात शासकीय यंत्रणा सारे काही घडून गेल्यावर उपाययोजना करेनच, परंतु नैसर्गिक आपत्तीपासून स्वत:चा बचाव कसा करता येईल, नागरिकांनी सतर्क राहणेही गरजेचे आहे. धोकादायक ठिकाणांवर सेल्फी घेणे, गड, किल्ले, ट्रेकिंग ठिकाणांची माहिती नसताना गर्दी करणे, पूर-धबधब्याचे फोटो काढणे आदी गोष्टी टाळणे क्रमप्राप्त आहे. स्वत: सुरक्षित राहिल्यास दुसºयाची सुरक्षितता जोपासता येते हेच सर्वाधिक महत्त्वाचे...अशी आहेमान्सूनपूर्व तयारी४जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला असून, कार्यालयीन वेळेमधील कर्मचाऱ्यांची ड्यूटी धरून जिल्हास्तरीय कार्यालयांचे कर्मचाºयांची रात्रीच्या दोन पाळ्यांमध्ये अशा एकूण तीन पाळ्यांमध्ये (दिवस व रात्र) नियंत्रण कक्ष सुरू आहे.४जिल्हा नियंत्रण कक्षासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक सर्वांसाठी कार्यान्वित करण्यात आलेला आहे.४तालुकास्तरावर १ जूनपासून २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात येऊन ते कार्यान्वित झाले आहेत.४जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुकास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी यांच्या आवश्यकतेनुसार मान्सूनपूर्व बैठक घेऊन तालुक्यामध्ये आवश्यक त्या आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आलेले आहे.४पाटबंधारे विभागास नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा साठा महसूल विभागास कळविणे तसेच सोडलेले पाणी व त्यामुळे बाधित होणारी गावे याबाबतची माहिती कळविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पूरबाधित गावांना अगोदर सूचना देणे काठावरच्या गावांमधील नागरिकांना धोका पोहोचू नये म्हणून आगाऊ कार्यवाही करणे सहज शक्य होणार आहे.गोदावरीच्या पुराचा धोकागोदावरी व दारणा नदी या दोन महत्त्वाच्या नद्या असून, या नद्यांवर धरणे बांधण्यात आलेली आहेत. गौतमी गोदावरी, कश्यपी, गंगापूर व आळंदी या चार धरणांतून साधारणत: वीस हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यास गोदावरी नदीच्या पुराचा फटका नाशिक शहरातील नदीकाठच्या वस्त्यांना पोहोचू शकतो. तर मुकणे, दारणा, कडवा, वालदेवी या धरणांतून पाणी सोडल्यास ते दारणा नदीतून ३५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यास दारणा, सांगवी, गोंडेगाव, कोठुरे, कालवी, सावळी, गंगावाडी या गावांना धोका पोहोचतो. वाघाड, करंजवण, पुनेगाव, ओझरखेड, पालखेड या धरणातून कादवा नदीतून ३५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्यास ब्राह्मणगाव, सुंदरपूर, रौळस या गावांना पुराचा धोका आहे.४गोदावरी, दारणा व कादवा या तीन धरणांचा विसर्ग नांदूरमधमेश्वर येथे येतो, त्यामुळे बॅक वॉटरमुळे सायखेडा, चांदोरी या गावांना आजवर वेळोवेळी पाण्याचा विळखा पडत असला तरी, गेल्या तीन वर्षांपासून नांदूरमधमेश्वर धरणाला दरवाजे बसविण्यात आल्याने पुराचा धोका कमी झाला असला तरी, साधारणत: ९० हजार क्यूसेकच्या पुढे विसर्ग झाल्यास चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, चाटोरी, खेडलेझुंगे, वडगाव, कानळद, कोपरगाव या गावांना पुराच्या पाण्याचा धोका आहे.

टॅग्स :Rainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय