मालेगाव : शहरातील मोसम नदीपात्रातील रक्तमिश्रित पाणी व घाण कचऱ्याचे विल्हेवाट लावावी या मागणीसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी बुधवारी रामसेतू पुलाजवळ आंदोलन केले.मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण यांची मध्यस्थी व लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शहराच्या मध्य भागाकडे वाहणाºया मोसम नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जाते. यामुळे नदीपात्र खराब होते. तसेच सांड पाणी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हीच घाण व सांडपाणी गिरणा धरणाला जाऊन मिळत असल्यामुळे धरणातील जलसाठाही प्रदूषित होतो. मोसम नदीपात्राची तातडीने स्वच्छता करावी या मागणीसाठी बोरसे यांनी अचानक आंदोलन सुरू केले होते. यामुळे मनपा व पोलीस प्रशासनाची धावपळ झाली.या आंदोलनाची माहिती पोलीस उपअधीक्षक चव्हाण, नवले, छावणीचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, अतिक्रमण विभाग प्रमुख राजू खैरनार, प्रभाग अधिकारी अनिल पारखे यांना मिळताच त्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. बोरसे यांची समजूत काढत महापालिका कार्यालयात घेऊन जात लेखी आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.फोटो फाईल नेम : ०५ एमएयुजी ०१ . जेपीजीफोटो कॅप्शन : मोसम नदीपात्राच्या स्वच्छतेच्या मागणीसाठी रामसेतू पुलावर आंदोलन करताना रामदास बोरसे.
मोसम नदी प्रदूषणप्रश्नी रामसेतूजवळ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 11:33 PM
मालेगाव : शहरातील मोसम नदीपात्रातील रक्तमिश्रित पाणी व घाण कचऱ्याचे विल्हेवाट लावावी या मागणीसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी बुधवारी रामसेतू पुलाजवळ आंदोलन केले.
ठळक मुद्देमोसम नदीपात्राची तातडीने स्वच्छता करावी या मागणीसाठी आंदोलन