दिंंडोरी : डॉ. आंबेडकर नगर विविध रिपब्लिकन आंबेडकरी पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी नाशिक विमानतळ नामांतर कृती समितीची स्थापना करण्यात आली. ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा घोषित करण्यात आला आहे. नाशिक विमानतळास पद्मश्री कर्मवीर खासदार दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीला समर्थन मिळविण्यासाठी कृती समितीचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे रिपब्लिकन नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन या विमानतळ नामांतराचा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येणार असून त्याचप्रमाणे कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ नामांतरासाठी प्रादेशिक मेळावे निमंत्रित करण्यात येणार आहेत. पहिला मेळावा १८ जुलै रोजी पुणे येथे घेण्याचे आयोजित करण्यात आले आहे. सुमारे चार तास चालेल्या बैठकीचे आयोजन तानसेन नन्नावरे व दादासाहेबांचे पणतू सागर गायकवाड यांनी केले होते. बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी मनोज संसारे, दयाल बहादुरे, राहूल डंबाळे, बाळराजे शेळके, विश्वनाथ काळे, प्रकाश लोंढे, पवन पवार, रवींद्र जाधव, किशोर घाटे, संजय साबळे, चिंतामण गांगुर्डे, दिनकर धीवर, मदन शिंदे, विलास कटारे, आनंद निर्भवने, नानासाहेब भालेराव, ॲड. अविनाश साळवे, विष्णू जाधव, संजय भालेराव, ईश्वरसिंग झंजोटड, काशीनाथ हिरे, अमोल पगारे, कुणाल वाघ, अनिल आठवले, रमेश जाधव आदींसह हजारो कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.
060721\img-20210706-wa0035.jpg
नाशिक विमानतळ नामांतर कृती समिती स्थापन