राज्यभरातील आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक यांनी आपल्या मागण्यांसाठी मंगळवार (दि. १५) पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
संपर्क कार्यालयावर मोर्चा दाखल होताच भुजबळांचे स्थानिक स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे मोर्चाला सामोरे गेले. यावेळी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन लोखंडे यांचेकडे देण्यात आले.
कोरोना कामाचा मोबदला म्हणून दरमहा १ हजार व गट प्रवर्तक यांना दरमहा ५०० रुपये देऊन शासन आर्थिक शोषण करत आहे. राज्य सरकारने प्रतिदिन ५०० रुपये याप्रमाणे मोबदला देऊन आशा व गट प्रवर्तकांचा सन्मान करावा, आशा पर्यवेक्षक यांना मागील थकीत मानधन त्वरित द्यावे, कोरोना आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते संतोष खैरनार, ज्ञानेश्वर दराडे, संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनंदा परदेशी, सविता आक्कर, एच. भजन, निशिगंधा पगारे, सुरेखा गायकवाड, स्वाती चव्हाण, सविता आहेर, सुमन लोखंडे यांसह आशा व आशा पर्यवेक्षक, गट प्रवर्तक मोठया संख्येने उपस्थित होते.
इन्फो
विमाकवच देण्याची मागणी
आशा स्वयंसेविकांना १८ हजार रुपये व गट प्रवर्तकांना २२ हजार प्रतिमहा वेतन देण्यात यावे, दरमहा कायम व निश्चित स्वरुपाची ३ हजार रुपये वाढ विनाविलंब देण्यात यावी, माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेच्या कामाचा मोबदला निश्चित करण्यात यावा, कोरोना बाधित झालेल्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विनामूल्य उपचार देण्यात यावा, आशा व पर्यवेक्षकांना विमाकवच देण्यात यावे आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.
फोटो- १६ येवला आशा
आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक यांनी विविध मागण्यांसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयावर काढलेला मोर्चा.
===Photopath===
160621\16nsk_50_16062021_13.jpg
===Caption===
फोटो- १६ येवला आशाआशा स्वंयसेविका व पर्यवेक्षक यांनी विविध मागण्यांसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयावर काढलेला मोर्चा