नाशिक : धनत्रयोदशी म्हणजे सोने व चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीचा दिवस. त्यामुळे नाशिककरांनी सराफ बाजारासह शहरातील दागिन्यांच्या विविध दालनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून खरेदी केल्याने शहरातील सराफ बाजारात सुमारे १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुद्ध सोन्याचे (२४ कॅ रेट) दर ३२ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचलेले असतानाही ग्राहकांनी शुद्ध सोन्यातील महालक्ष्मीची प्रतिमा मुद्रित असलेल्या नाण्यांच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती दिली. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ३० हजार ४०० रुपये होते. या गुणवत्तेच्या सोन्यात होत असलेल्या दागिन्यांची दिवाळीच्या सणाचे औचित्य साधणाºया ग्राहकांसोबतच आगामी लग्नसराईची तयारी करणाºया ग्राहकांनी सराफ पेढ्यांमध्ये अक्षरश: रांगा लावून खरेदी केली. चांदीची लक्ष्मीमूर्ती आणि नाण्यांसह पूजेचे साहित्य आणि भांड्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीने धनसंचय आणि संपत्ती वृद्धिंगत होत असल्याचा समज असल्याने सोमवारी सराफा बाजारातील सर्व उचांक मोडीत निघाले असून, एका दिवसातच तब्बल शंभर कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.नाशिककरांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने-चांदीच्या दागिन्यांसह चांदीच्या भांड्यांचीही खरेदी केली. विशेष म्हणजे आज शुद्ध सोन्याचे नाणे खरेदी करणाºया ग्राहकांची रीघ लागली होती. शुद्ध सोन्याच्या नाण्यामध्ये लक्ष्मीची प्रतिमा असलेल्या नाण्यांना मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी पसंती दिली. - मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकारधनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची परंपरा नाशिककरांनी यावर्षीही कायम राखली, त्यामुळे सराफ बाजारात उत्साह संचारला असून सराफ बाजारात दिवसभरात जवळपास १०० कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.- नीलेश बाफना, संचालक, बाफना ज्वेलर्स
सराफ बाजारात शंभर कोटींहून अधिक उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:51 AM