नाशिक : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक वेगाने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून केवळ एका महिन्यात दीड लाखाइतकी वाढ आहे. गत वर्षभरातील बाधित संख्येत या एकमेव महिन्याने जवळपास तेवढीच भर घातली आहे. दरम्यान, गुरुवारी कोरोनामुक्त नागरिकांच्या संख्येने तब्बल ३ लाखांचा टप्पा ओलांडून ३ लाख ४ हजार ५६२ पर्यंत मजल मारल्याने कोरोनामुक्त संख्येने काहीसा दिलासा मिळाला आहे.कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णसंख्या वाढण्याची बाब जिल्ह्यासाठी नक्कीच दिलासादायक आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढदेखील गत आठवड्यातील सहा हजारांच्या तुलनेत निम्म्यावर म्हणजे तीन ते चार हजारांवर आली आहे. त्यामुळे नाशिककरांच्या दृष्टीने कोरोनामुक्त रुग्णांनी तीन लाखांचा आकडा ओलांडणे हे निश्चितच काहीसे दिलासादायक आहे.एप्रिल महिन्यातील वाढ उच्चांकीएप्रिल महिन्याच्या १ तारखेला गत वर्षभरातील बाधितांचा आकडा १ लाख ८५ हजार ३०६ तर कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ५५ हजार ५९१ इतकी आहे. तर गुरुवारी आतापर्यंतच्या बाधितांचा आकडा ३ लाख ४२ हजार ९१ वर पोहोचला असून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ३ लाख ४ हजार ५६२ वर पोहोचली आहे.दुसरी लाट सर्वाधिक घातकमार्च महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने खऱ्या अर्थाने बाधित संख्येचा वेग वाढला आहे. गतवर्षीच्या एप्रिल अखेरपासून यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत केवळ १ लाख २२ हजार ९५० बाधित तर १ लाख १७ हजार ८६० कोरोनामुक्त झाले होते. म्हणजेच गत संपूर्ण वर्षभरात जितके बाधित आणि कोरोनामुक्त झाले त्यापेक्षा अधिक बाधित केवळ मार्च आणि एप्रिल महिन्यात मिळून झाले आहेत.
केवळ एप्रिल महिन्यात दीड लाखाहून अधिक बाधित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 11:47 PM
नाशिक : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक वेगाने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून केवळ एका महिन्यात दीड लाखाइतकी वाढ आहे. गत वर्षभरातील बाधित संख्येत या एकमेव महिन्याने जवळपास तेवढीच भर घातली आहे. दरम्यान, गुरुवारी कोरोनामुक्त नागरिकांच्या संख्येने तब्बल ३ लाखांचा टप्पा ओलांडून ३ लाख ४ हजार ५६२ पर्यंत मजल मारल्याने कोरोनामुक्त संख्येने काहीसा दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देदिलासा : कोरोनामुक्तांच्या संख्येने ओलांडला ३ लाखांचा आकडा