शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

दोनशेहून अधिक लघु उद्योजकांना मिळणार हक्काचे गाळे ! अंबड औद्योगिक क्षेत्रात नवा प्रकल्प पूर्ण : दर कमी झाल्यानंतर मिळणार जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:34 AM

नाशिक : औद्योगिक क्षेत्रात पुरेशा जागेअभावी भाड्याच्या जागेत उद्योग चालवणाºयांसाठी खूशखबर असून, औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेला गाळे प्रकल्प पूर्ण झाला आहे.

ठळक मुद्देऔद्योगिक क्षेत्रात ७० टक्के उद्योजक भाड्याच्या जागेतच वर्षानुवर्षे व्यवसाय

नाशिक : औद्योगिक क्षेत्रात पुरेशा जागेअभावी भाड्याच्या जागेत उद्योग चालवणाºयांसाठी खूशखबर असून, औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेला गाळे प्रकल्प पूर्ण झाला आहे. नव्या वर्षात त्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागवून देकाराची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे किमान २०९ लघु उद्योजकांना हक्काची जागा मिळणार आहे.औद्योगिक क्षेत्रात सुमारे ७० टक्के लघु उद्योजक असून, आपापल्या परीने जागा मिळवून ते उद्योग करीत असतात. तथापि, सर्वच लघु उद्योजकांना शासकीय जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे भाड्याच्या जागेतच वर्षानुवर्षे व्यवसाय करावा लागतो. सध्या सातपूर आणि अंबड औद्यागिक वसाहतीत सुमारे पाचशेहून अधिक लघु उद्योजक आहेत. याशिवाय नव्या लघु उद्योगांची भर पडत असते. काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने औद्योगिक वसाहतीतील रिक्त भूखंड खासगी विकासकांना देऊन त्यात फ्लॅटेड इमारती बांधून विकण्याची मुभा दिली होती. त्यास विरोधही झाला होेता. विकासकांना भूखंड देऊन बांधण्यापेक्षा औद्योगिक विकास महामंडळानेच गाळे बांधले तर कमी दरात उपलब्ध होतील अशी भूमिका उद्योगमित्र संस्थेने घेतली होती. त्यावर न्यायालयीन लढाई यशस्वी ठरली आणि औद्योगिक विकास महामंडळाने तीनपैकी एका भूखंडावर स्वत:च फ्लॅटेड इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंबड औद्योगिक वसाहतीत सिमेन्स कंपनीसमोर हर्ष कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून २०१५ मध्ये काम सुरू झालेली इमारत पूर्ण झाली आहे. सुमारे १४ हजार ८५० चौ.मी. क्षेत्रात बांधण्यात आलेल्या या इमारतीत २०९ गाळे असून, सहाशे ते अठराशे चौरस फूट आकाराचे भूखंड आहेत. आता जागेसाठी निविदा मागवून त्या स्थानिक तसेच यापूर्वीपासून उद्योग चालविणाºयांना देण्यात येणार आहेत. यामुळे नव्या वर्षात २०९ गाळेधारक नव्या जागेत हक्काच्या जागेत स्थलांतरित होऊ शकतील.दर कमी होण्याची प्रतीक्षामहाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने बांधण्यात आलेल्या फ्लॅटेड इमारतीत १४ हजार ८५० चौमी क्षेत्रात ही इमारत बांधण्यात आली असून, ६०० ते १८०० अशा विविध आकारांचे एकूण २०९ गाळे उपलब्ध आहेत. या तीन मजली इमारतीत वाहनतळाची प्रशस्त जागा असून, पॅसेंजर आणि माल नेण्यासाठी स्वतंत्र लिफ्ट आहेत. तसेच तिसºया मजल्यापर्यंत मटेरियल नेण्यासाठी आणि आणण्यासाठी मालमोटार जाऊ शकेल अशी व्यवस्था असल्याने उद्योजकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे. औद्योगिक विकास महामंडळाने सध्याचा भाव हा ५२५० रुपये प्रति चौरस फूट असा निश्चित केला असून, याच क्षेत्रात खासगी विकासकाने तीन हजार रुपये चौरस मीटर दराने गाळे विकल्याचे कागदोपत्री दाखवले असल्याने त्या आधारे याच दरानुसार नव्या इमारतीतील गाळ्यांचे वाटप व्हावे अशी त्यांची मागणी आहे. राज्य सरकार सध्या तरी दर कमी करण्यास अनुकूल असून, त्यामुळे नव्या वर्षात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.