नाशिक : शहरातील उघड्यावरील बेकायदा मांसविक्री रोखण्यासाठी महापालिकेने काही अटी-शर्तींवर परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आत्तापर्यंत सुमारे अडीचशे व्यावसायिकांनी अर्ज केले असून, प्रत्यक्ष पाहणी करून नियमात बसणाऱ्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे.शहरात शेकडो व्यावसायिक उघड्यांवर मांसविक्री करतात. त्यामुळे अनारोग्याचा प्रश्न निर्माण होतोच, परंतु भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील वाढते. महापालिकेच्या विविध समित्यांवर याबाबत चर्चादेखील झाली आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी मांसविक्रीसाठी नियम आणि उपविधी तयार करून राज्य शासनाकडे पाठविले असले तरी सुमारे सात ते आठ वर्षांपासून ते पडून आहेत. त्यामुळे महापालिकेला कारवाई करता येत नाही त्यातच अनेक व्यावसायिकांनी महापालिकेकडे परवानगी मागितली तरीही ती देण्यात अडचण होती. तथापि, गेल्यावर्षी प्रशासनाने मोजक्या अटी-शर्तींच्या आधारे परवानगी देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला होता. तो मंजूर झाल्यानंतर स्थायी समितीनेदेखील त्यावर शिक्कामोर्तब केले. त्या आधारे संबंधित व्यावसायिकाची स्वत:ची अथवा भाड्याची जागा आहे काय, त्याचप्रमाणे पाणीपुरवठा आणि निचऱ्यासाठी गटारीची काय व्यवस्था आहे, हे पडताळून परवानगी देण्यात येणार आहे.महापालिकेने यासंदर्भात तयार केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्रत्येक विभागातून सुमारे चाळीस ते पन्नास अर्ज असे सुमारे अडीचशे अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची छाननी करून नियमानुसार परवानगी दिली जाणार आहे.मांसविक्री थांबणारमहापालिकेने उघड्यावरील मांसविक्री करणाऱ्यांनाअटी-शर्तीवर परवानगी देण्याचे ठरवले आहे. त्यात स्वत:ची किंवा भाड्याची जागा असणे आवश्यक आहे, अशी अट असून, रस्त्यावर व्यवसाय करणाºयांना परवानगी नाकारली जाऊन थेट कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे उघड्यावरील मांसविक्रीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
मांसविक्री नियमनासाठी अडीचशेहून अधिक अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:04 AM