नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सत्तरीपर्यंत पोहोचला आहे. त्यातही सर्वाधिक रु ग्ण मालेगावचे असून, संपूर्ण मालेगाव शहर हे कोरोनाच्या विळख्यात सापडल्यासारखी अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख म्हणून डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आल्यापासून त्यांनी सर्वच आघाड्यांवर जोरदार मोहीम उघडली आहे. यापूर्वी बाधित झालेल्यांवर योग्यपद्धतीने उपचार होण्याबरोबरच नवीन कोरोनाबाधित होऊ नयेत, यासाठी पोलीस आणि आरोग्य यंत्रणेचा सुयोग्य मेळ साधत प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधितांच्या आसपासच्या परिसरातील ७० हजारांहून अधिक नागरिकांची गत आठवडाभरात तपासणी करण्यात आली आहे. तसेच सर्व शासकीय यंत्रणेला गतिमान करत कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दिशेने यंत्रणा जिवाचे रान करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. पंकज आशिया यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : मालेगावमध्ये शासकीय यंत्रणा नक्की कशाप्रकारे कार्य करते?उत्तर : मालेगावमध्ये कार्यभार हाती घेतल्यापासून आरोग्य, पोलीस आणि प्रशासन या तिन्ही विभागांच्या प्रमुखांनी मिळून आराखडा तयार केला. त्यानुसार केवळ मालेगावमध्ये १३७हून अधिक पथके निर्माण करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून घरोघर जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामुळे बाधितांचे कुटुंबीय, निकटवर्तीय त्यांच्या परिसरातील रहिवाशांची तातडीने तपासणी होत असून, त्याद्वारे संशयितांना त्वरित रु ग्णालयात भरती करून घेतले जात आहे. तसेच बाधेची शक्यता असलेल्यांना क्वारंटाइन करून घेतल्याने त्यांच्यापासून होऊ शकणारा पुढील धोकादेखील टाळला जात आहे.प्रश्न : प्रशासनाला नागरिकांचे पुरेसे सहकार्य मिळत आहे का?उत्तर : कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक सापडण्याचे कारण हे आरोग्य आणि प्रशासन यंत्रणा अधिक तपासण्या करत असल्यामुळेच शक्य झाले आहे.-------------अधिकाधिक कोरोना संशयित शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यासह तपासण्यादेखील केल्या जात आहेत. त्यामुळे आपोआपच कोरोना फैलाव रोखला जात असून, कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण हळूहळू निश्चितपणे कमी होत जाणार आहे. नागरिकांनी दिलेले सहकार्य कायम राहिल्यास महिनाअखेरपर्यंत कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यल्प होण्यापर्यंत आम्ही यश मिळविलेले असेल, असा मला विश्वास वाटतो.
मालेगावमधील ७० हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी :- डॉ. पंकज आशिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:44 PM