लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- शहरात कोरोना बाधीतांचे बरे होण्याचे प्रमाण वाढतच आहे. ६ एप्रिल पासून आत्तापर्यंत ४२ हजार रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३६ हजार २३७ रूग्ण कोरोनामुक्तत झाले आहेत. दरम्यान, गेल्या चोविस तासात ८७९ नवे बाधीत आढळले असून सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात येत आहेत. विशेषत: मध्यंतरी अँटीजेन टेस्ट किटसची टंचाई जाणवत होती. त्यातच किटसचा खर्च वाढत आहे. ३ सप्टेंबर रोजी आयसीएमआरने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्याने तेच निमित्त करून चाचण्या कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, महासभेत झालेली चर्चा आणि नंतर किटस देखील उपलब्ध झाल्याने चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज सहा ते सातशे रूग्ण आढळत आहे. मात्र, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहेत. आत्तापर्यंत ३६ हजार २३७ रूग्णकोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी (दि.१९) १हजार २३२ रूग्ण विलगीककरकक्षातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.उर्वरीत रूग्ण उपचार घेत आहेत.गेल्या चोवीस तासात शहरात ८७९ रूग्ण आढळले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिकरोड येथील देवळाली गावातील ६८ वर्षीय वृध्द पुरूष, जेलरोडवरील दत्त विहार परीसरातील ६० वर्षीय वृध्द, जुन्या नाशकात पखालरोडवरील ५६ वर्षीय पुरूष, सिडको विभागात कामटवाडे येथील ४३ वर्षीय पुरूष, पंचवटीत रामसेतू जवळील ५५ वर्षीय रूग्ण तर आडगाव येथील ७८ वर्षीय वृध्दाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकिय विभागाच्या सूत्रांनी सांगितले.पंचवटी पाठोपाठ सिडको हॉटस्पॉट महापालिकेच वतीने आत्तापर्यंत १ लाख ६१हजार २१२ संशयित कोरोना बाधीतांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात १ लाख २३ हजार ४४१ रूग्ण निगेटीव्ह आले आहेत. शहरात पंचवटी हा कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता सिडको विभाग देखील हॉट स्पॉट ठरत आहे. या दोन्ही विभागांमध्ये रूग्णांची संख्या नऊ हजाराहून अधिक आहे. सर्वात कमी संख्या नाशिक पश्चिम विभागातील आहे.मिशन झिरो नाशिक महापालिका आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून मिशन झिरो नाशिक अंतर्गत शनिवारी (दि.१९) १ हजार ५३ चाचण्या करण्यात आल्या. यात २४३ संशयित रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. या मोहिमेत आत्तापर्यंत म्हणजे ५५ दिवसात ६८ हजार ६२ अॅँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात ११ हजार ३७६ कोरोना बाधीत आढळले आहेत. उर्वरीत ५६ हजार ६८६ व्यक्तींची भीती दुर होऊन त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शनिवारी रविवार कारंजा आणि आकाशवाणी केंद्राजवळील भाजी बाजार याठिकाणी स्मार्ट हेल्मेटव्दारे थर्मल स्क्रिनींग करण्यात आले. यावेळी ४ हजार ८५०नागरीकांचे स्क्रीनींग करण्यात आले. यात ५१ जणांना संशयित म्हणून शोधण्यात आले. त्यातील ३५ नागरीकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली असून सात जण कोरोना बाधीत आढळले आहेत.