नाशिकरोड : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून कोकेन नावाचा अमली पदार्थ शहरात विक्रीसाठी आलेल्या एकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याकडून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. त्याचबरोबर कोकेन खरेदी करू पाहणाऱ्या नाशकातील दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, तिघांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.नाशिकरोडच्या चेहेडी पंपिंग रस्त्यावरील खर्जुल मळा येथे कोकेन नावाचे अमली पदार्थ खरेदी-विक्रीसाठी दोन-तीन जण येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस कर्मचारी युवराज पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चेहेडी पंपिंगरोड खर्जुल मळा येथील येसूबाई संभाजीराजे भोसले उद्यानाजवळ सापळा रचला होता.
तब्बल ९० लाखांचे कोकेन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 10:33 PM
नाशिकरोड : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून कोकेन नावाचा अमली पदार्थ शहरात विक्रीसाठी आलेल्या एकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याकडून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. त्याचबरोबर कोकेन खरेदी करू पाहणाऱ्या नाशकातील दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, तिघांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्दे कोकेन नावाचे अमली पदार्थ खरेदी-विक्रीसाठी दोन-तीन जण येणार असल्याची गुप्त माहिती