रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपप्रसंगी महाकवी कालिदास कलामंदिरात बुधवारी (दि.१७) जीवनदुत गौरव सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणुन बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, परिवहन विभागाचे सहआयुक्त जितेंद्र पाटील, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचीन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदि उपस्थित होते.राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशनानुसार जिल्ह्यात १८ जानेवारीपासून प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम हाती घेतले गेले. सर्वसामान्यांमध्ये रस्ते सुरक्षाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने दुचाकी हेल्मेट व सीटबेल्ट रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सहभागी विविध रायडर्स ग्रुपच्या सदस्यांनाही या कार्यक्रमात गौरविण्यात आले. दरम्यान, कळसकर यांनी शब्दबध्द केलेले ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ या गीताच्या ध्वनीफितीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी धाव घेणारे शाम बगडाणे तसेच अपघातामध्ये आपल्या पतीला गमावणाऱ्या सिन्नरच्या सरोजिनी काळमेख यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक भरत कळसकर यांनी केले.
---इन्फो--
‘रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका बहुमुल्य’
प्रादेशिक परिवहन विभागाने तयार केलेली ‘रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका’ ही पुस्तिका सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. या पुस्तिकेचा लाभ नागरिकांना अधिकाधिक करुन देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील विविध शाळा, महाविद्यालयांसह ग्रामपंचायतींमध्ये या पुस्तिकेच्या प्रती पोहचवून ग्रामीण भागात रस्ते सुरक्षाविषयी जागृती करण्याची सुचनाही त्यांनी केली.
---
फोटो : १७पीएचएफबी६७
कॅप्शन : जीवनदुत सरोजिनी काळमेख यांचा सन्मान करतान परिवहन विभागाचे आयुक्त डॉ. अविनाश सोनवणे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे. समवेत विनय अहिरे, भरत कळसकर, सचिन पाटील, दीपक पाण्डेय, जितेंद्र पाटील आदि.
===Photopath===
170221\17nsk_63_17022021_13.jpg
===Caption===
जीवनदुत सरोजिनी काळमेख यांचा सन्मान करतान परिवहन विभागाचे आयुक्त डॉ. अविनाश सोनवणे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे. समवेत विनय अहिरे, भरत कळसकर, सचिन पाटील, दीपक पाण्डेय, जितेंद्र पाटील आदि.