नाशिक : दहावीच्या परीक्षा पार पडल्यानंतर नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेची सुरुवात झाली असून, जिल्हाभरातील अन्य महाविद्यालयांतही अकरावी प्रवेशाचे नियोजन सुरू झाले आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी तीन नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे. तसेच पाच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वाढीव तुकड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सुमारे दीड हजारहून अधिक जागा वाढणार असून, दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरासह जिल्हाभरातील कनिष्ठमहाविद्यालयांत कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त शाखा यांच्या तब्बल ७८ हजार ८०० जागा उपलब्ध होणार आहेत.नाशिकसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये यंदाही अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या होणार आहे. नाशिकमध्ये यंदा देवळाली विभागातील तीन महाविद्यालये आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षी शहरातील महापालिका हद्दीतील ५५ महाविद्यालयांत आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या होणार असून, त्यासाठी एकूण २७ हजार जागा उपलब्ध आहेत, तर जिल्हाभरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅफलाइन प्रवेशप्रक्रि या होणार असून, ५१ हजार ८०० जागा उपलब्ध असतील. नाशिक शहरात उन्नती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, संदीप फाउंडेशन ज्युनिअर कॉलेज, अॅम्ब्रो ज्युनिअर कॉलेज या वर्षापासून सुरू होणार आहेत. पाच कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान शाखेसाठी वाढीव तुकड्या घेतल्या आहेत, तर दहा कॉलेजांनीही वाढीव तुकड्यांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माहिती पुस्तिका उपलब्ध होतील.नाशिक जिल्ह्यातील शाखानिहाय जागा नाशिक शहरातील विविध ५५ महाविद्यालयांमध्ये सुमारे २७ हजार जागा असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २९८ महाविद्यालयांमध्ये ५१ हजार ८०० जागा उपलब्ध आहेत. यात कला शाखेच्या ग्रामीण भागात २६ हजार ६४० व शहर परिसरात ५४२० जागा आहेत, तर विज्ञानच्या ग्रामीणमध्ये १७ हजार ८० व शहरात १० हजार, वाणिज्य शाखेच्या ग्रामीणमध्ये ६ हजार ६०० व शहर परिसरात ९ हजार ८०० जागांसह संयुक्त शाखांच्या १४८० ग्रामीण जागा व ७८० शहरी जागा अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
अकरावीच्या दीड हजारहून अधिक जागा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:31 AM