नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मंगळवारी (दि.१६) सलग सातव्या दिवशी बाधितांच्या संख्येने हजारचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी एकाच दिवस १३५४ बाधित आढळले आहेत. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या सहा दिवसांपासून एक हजाराच्या वर नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वाधिक बाधितांची संख्या आहे. मंगळवारी एकूण १ हजार ३५४ रुग्ण आढळले आहे.n नाशिक शहरात ९४४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २७९, तर मालेगाव ९६, जिल्ह्याबाह्य ३५ रुग्णांचा समावेश आहे. n दिवसभरात जिल्ह्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात महापालिका क्षेत्रातील पाच, मालेगावमधील दोन तर अन्य ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा समावेश आहे. n नाशिक शहरात एकूण ७ हजार २३० बाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्यात बळी गेलेल्यांची संख्या २ हजार १८४ झाली आहे.
जिल्ह्यात सातव्या दिवशीही हजाराहून अधिक बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 1:36 AM