शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

आणखी पाणीकपातीचे दाटणार ढग

By admin | Published: November 29, 2015 12:04 AM

उद्या विशेष महासभा : दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे संकेत

नाशिक : जलसंपदा मंत्रालयाने महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात केल्यानंतर येत्या काही दिवसांत उद्भवणार्‍या जलसंकटाचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठय़ाचे फेरनियोजन केले जाण्याची शक्यता असून, सोमवारी (दि.३0) होणार्‍या विशेष महासभेत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पुढील आठ महिन्यांत उपलब्ध पाणीसाठय़ात पुरवठा करण्याचे आव्हान महापालिकेसमोर असल्याने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे संकेत मिळत आहेत. महासभेतील निर्णयाकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.महापालिकेला गंगापूर धरणातून २७00 दलघफू, तर दारणा धरणातील ३00 दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. महापालिकेने जुलै २0१६ अखेरपर्यंत ३१३७ दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती; परंतु जलसंपदा मंत्रालयाने ती फेटाळून लावत महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करतानाच गंगापूर धरणातून शेतीसाठीही तीन आवर्तने सोडण्याचे निश्‍चित केले. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक महापालिकेपुढे पाणीपुरवठय़ाबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शहरात एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी गंगापूर धरणातून रोज १२.३६ दलघफू इतके पाणी उचलले जात आहे. २३ नोव्हेंबरअखेर प्राप्त आकडेवारीनुसार गंगापूर धरणात २९९१ म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेला सदर साठा ८६ टक्के होता. कश्यपी धरणात ३२ टक्के, तर गौतमी गोदावरीमध्ये २८ टक्के पाणीसाठा आहे. महापालिकेसमोर आरक्षित उपलब्ध साठय़ात पाणीपुरवठय़ाचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातूनच एकवेळ पाणीपुरवठा चालू ठेवतानाच एक दिवसाआड पाणीपुरवठा करता येईल काय, याची चाचपणी पाणीपुरवठा विभागामार्फत केली जात आहे. शहरात पहिल्यांदाच एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाला नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याने त्याचे तीव्र पडसादही उमटण्याची शक्यता आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाल्यास दरमहा १८५ दलघफू पाण्याची बचत होणार असून, जुलैअखेर १४८३ दलघफू पाण्याची बचत होऊन महापालिकेला संभाव्य संकटाचा सामना करणे सोपे होणार आहे. सोमवारी होणार्‍या विशेष महासभेत याबाबत सदस्य काय भूमिका घेतात आणि महापौर काय निर्णय देतात याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)