मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील परिसरात पहाट काकड आरतीचा गजर होत असून, धार्मिक गीतांनी भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांची पहाट उजाडत आहे. मानोरी येथे कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हनुमान मंदिरात काकड आरती सोहळा हा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती येथील भाविकांनी दिली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे आजही तुलसी विवाह सोहळा कार्यक्र म होणार आहे.कोजागरी पौर्णिमेपासून नित्यनेमाने येथील भाविक तान्हाजी वावधाने, साहेबराव शेळके, सुनील शेळके, संतोष शेळके, सचिन शेळके, रमण तळेकर, अक्काबाई मखरे, सुनीता शेळके, शांताबाई वावधाने, कुसुम वावधाने, शोभा तळेकर,शारदा ताजने, चंद्रकला शेळके आदी भाविक पहाटे काकडा आरती घेत असून, पहाटे काकडा पेटवून विविध प्रकारच्या धार्मिक गीतांना सुरु वात केली जात आहे.(फोटो १० मानोरी १)फोटो : मानोरी येथे काकडा आरती घेताना भाविक.
मानोरीत पहाटे काकड आरतीचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 7:14 PM