शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

बिबट्याच्या भीतीने मॉर्निंग वॉक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:43 AM

बिबट्याचा मुक्तसंचार डावा कालवा परिसरात वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. डाव्या कालव्यावरच नव्हे तर बिबट्याने थेट जुना गंगापूर नाका, रामवाडी, कोशिरे मळा या भागात नागरिकांना दर्शन दिले.

नाशिक : बिबट्याचा मुक्तसंचार डावा कालवा परिसरात वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. डाव्या कालव्यावरच नव्हे तर बिबट्याने थेट जुना गंगापूर नाका, रामवाडी, कोशिरे मळा या भागात नागरिकांना दर्शन दिले. शुक्रवारी (दि.२५) बिबट्या चक्क गंगापूररोडवरील सावरकरनगमध्ये शिरल्यामुळे नागरिकांची पाचावर धारण बसली. या भागातील नागरिकांनी सकाळी निर्जन रस्त्यांवर ‘मॉर्निंग वॉक’ला जाणे बंद केले आहे.सावरकरनगर, शारदानगर, शंकरनगर या उच्चभ्रू लोकवस्तीत शुक्रवारी पाहुणा आलेला बिबट्या शेकडो बघ्यांच्या गर्दीमुळे चांगलाच बिथरला. या पाहुण्याला लाठ्या-काठ्यांचा ‘प्रसाद’ही मिळाला. तीन तास चाललेल्या या धावपळीत तो चांगलाच दमला अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केले. खरे तर लोकांसोबत त्यानेही जेरबंद झाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला असावा अन् आपण जागा चुकल्याची जाणीव पिंजºयात त्यालाही झाली असावी. बिबट्या जेरबंद झाला असला तरी त्याची दहशत या परिसरात अद्यापही कायम आहे. दोन दिवस उलटूनदेखील सूर्योदय होताच फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºयांची संख्या रोडावल्याचे चित्र आहे....तर मानव-बिबट संघर्ष टळेलबिबट्याचा संचार अद्यापही या भागात असू शकतो या भीतीने नागरिक सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला जाणे टाळताना दिसून येत आहे. ‘मॉर्निंग वॉक’ला जाताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. कारण बिबट्या रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेला असतो आणि पहाटेच्या वेळी दिवस उजडताच तो नैसर्गिक अधिवासात सुरक्षित जाण्याचा प्रयत्नात असतो. त्यामुळे सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान त्याची हालचाल नजरेस पडण्याची शक्यता असते, अशावेळी नागरिकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत कुठलाही गोंगाट न करता सुरक्षितरीत्या निघून गेल्यास बिबट-मानव संघर्ष सहज टाळता येऊ शकतो.ज्येष्ठांमध्ये अधिकभीतीचे वातावरणसकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºयांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या अधिक असते. लोकवस्तीत थेट बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये घबराहट कायम आहे. यामुळे सकाळच्या सुमारास गोदाकाठालगत चोपडा लॉन्स ते हनुमानवाडी रस्ता, आकाशवाणी टॉवर, पंपिंग स्टेशनरोड, होरायझन शाळा दत्तमंदिरमार्गे मखमलाबाद रस्ता, चांदशी, आनंदवल्लीकडे जाणारा गोदापार्कचा रस्ता या भागात फेरफटका मारणाºयांची संख्या कमी झाली आहे. बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक