मालेगाव : राज्याच्या बालदर मृत्यूपेक्षा मालेगाव शहरातील बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरात बालमृत्यूची २७.७७ टक्के प्रमाणाची अधिकृतरीत्या नोंद करण्यात आली असून, बालमृत्यू रोखण्यास आरोग्य यंत्रणेला सपशेल अपयश आले आहे. राज्य शासन बालमृत्यू रोखण्यासाठी विविध योजना राबवित आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मालेगाव शहरात महापालिकेची व शासनाच्या आरोग्य विभागाची अशा दोन यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र या दोन्ही यंत्रणेला बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यास अपयश येत आहे. राज्यातील मेळघाटापेक्षा शहरातील बालमृत्यूचे प्रमाण गंभीर आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान शून्य ते एक वर्ष वयोगटातील ५५५ बालकांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक बालमृत्यू
By admin | Published: March 04, 2017 12:09 AM