नाशिक : शहराच्या किमान तपमानात घट झाल्यामुळे रविवारी पारा थेट १०.४ अंशापर्यंत घसरला. यामुळे राज्यात सर्वात कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असून नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरूवात केली आहे.गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून पारा १०.४ अंशावर आल्याने नाशिककर गारठले आहे. हंगामातील हे सर्वात निचांकी किमान तपमान नोंदविले गेले. मागील वर्षी थंडीचा कडाका १२ नोव्हेंबरला कमालीचा होता. त्यावेळी शहराचे किमान तपमान ९.६ इतके नोंदविले गेले होते. यंदा १०.४ अंशापर्यंत या दिवसाला पारा घसरला. पहाटेपासून तर सकाळी साडे आठ वाजेपर्यंत नाशिककरांना थंडी जाणवत होती. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजेपासून पुन्हा थंडीचा जोर वाढण्यास सुरूवात झाली होती. सुर्यास्तानंतर थंडीची तीव्रता वाढली असून गोदाकाठावर शेकोट्या पेटवून मजुरी करणा-या कुटुंबियांनी उब मिळविण्याचा प्रयत्न केला.
राज्यात नाशिकला सर्वाधिक थंडी; पारा @ १०.४ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 6:39 PM
गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून पारा १०.४ अंशावर आल्याने नाशिककर गारठले आहे. हंगामातील हे सर्वात निचांकी किमान तपमान नोंदविले गेले
ठळक मुद्दे मागील वर्षी थंडीचा कडाका १२ नोव्हेंबरला कमालीचा होता. यंदा १०.४ अंशापर्यंत या दिवसाला पारा घसरला. राज्यात सर्वात कमी किमान तपमान नाशिकमध्ये