नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. वातावरणात प्रचंड गारवा वाढल्यामुळे नाशिककरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. रविवारी (दि.२७) ८.१ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली. शहरात मागील गुरुवारपासून शीतलहर आली असून, संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत वेगाने थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानावर परिणाम जाणवत आहे. ४संध्याकाळपासून थंड वाऱ्याचा वेग वाढत असल्याने किमान तापमानाचा पारा घसरत आहे. दिवसाही थंड वारे वाहत असल्यामुळे दिवसभर उबदार कपडे परिधान करावे लागत आहे.४गुरुवारी किमान तापमान ९.९ अंश तर शुक्रवारी तापमानाचा पारा ९.२ अंशांपर्यंत घसरला. शनिवारी ८.३ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. या चार दिवसांमध्ये शहरात थंडीचा कडाका प्रचंड जाणवत आहे.४संध्याकाळी तसेच सकाळीदेखील थंड वाºयांचा वेग अधिक असल्यामुळे शनिवारी तसेच रविवारी सकाळीदेखील गारवा जाणवत होता.४मकरसंक्रांतीनंतर थंडी कमी होईल, अशी नागरिक आशा बाळगून होते. कारण डिसेंबरच्या पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत होते.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही थंडी होती. मात्र, दुसºया आठवड्यात किमान तापमानाचा पारा थेट १२ अंशांपार पोहचला होता यामुळे काही दिवस थंडीपासून दिलासा मिळाला होता.
राज्यात सर्वाधिक थंडी नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:00 AM