पेठ : पावसाचे चेरापुंजी असलेल्या पेठ तालुक्यात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी ८ वाजेपावेतो पावसाने धुवाधार बॅटिंग केल्याने जनजीवन विस्कळित झाले असून, तालुक्यातील धरणे व नदी, नाले दुथडी वाहत आहेत. २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे पेठ ते जोगमोडी, करंजाळी ते हरसूल, पेठ ते भुवन, पेठ-सुरगाणा यासह सर्वच रस्ते बंद पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे.तालुक्यातील इनामबारी धरणाखाली मातीचा भराव खचला. प्रशासनाच्या सर्तकते मोठी र्दुघटना टळली असून, गावकऱ्यांच्या सहकार्याने धरणाची दुरु स्ती करण्यात आली असून, धरणाखालील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. वाघेरा घाट खचल्याने मोठ्या प्रमाणात माती-दगड रस्त्यावर आल्याने कुळवंडी, कोहोर, हरसूल, पाटे आदी गावांचा संपर्क तुटला आहे. भुवन ते हरसूल मार्गावरील खामशेत-लव्हाळी घाटात दरड कोसळल्याने तिकडील गांवाचा संपर्क तुटला आहे . रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला असून, मोबाईल बॅटºया डिक्सचार्ज झाल्याने एकमेकांशी संपर्क साधणे दुरापास्त झाले आहे. तालुक्यात अतिवृष्टीने खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा संपर्काअभावी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने नुकसानीबाबत खुलासा करणे अवघड आहे.
पेठ तालुक्यातील बहुतेक रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:47 AM
पेठ : पावसाचे चेरापुंजी असलेल्या पेठ तालुक्यात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी ८ वाजेपावेतो पावसाने धुवाधार बॅटिंग केल्याने जनजीवन विस्कळित झाले असून, तालुक्यातील धरणे व नदी, नाले दुथडी वाहत आहेत. २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे पेठ ते जोगमोडी, करंजाळी ते हरसूल, पेठ ते भुवन, पेठ-सुरगाणा यासह सर्वच रस्ते बंद पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे.
ठळक मुद्दे२०० मिमी पाऊस : धरणे, नद्या, नाले दुथडी वाहू लागले