नाशिक : अन्य युरोपीयन देशांच्या तुलनेत इतकेच नव्हे तर शेजारील लहान असलेल्या पाकिस्तान देशापेक्षाही दर हजारी वाहनसंख्या सर्वांत कमी असूनही भारतात दरवर्षी अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असल्याची धक्कादायक आकडेवारी नाशिक येथील सामाजिक संस्था ‘नाशिक फर्स्ट’ने जाहीर केली आहे.नाशिक येथील महाराष्ट्रातील सर्वांत पहिले मुलांचे वाहतूक प्रशिक्षण उद्यानाचा शुभारंभ झाला. त्या कार्यक्रमात या उद्यानाच्या उभारणीत महत्त्वाचा भाग असलेल्या नाशिक फर्स्ट या संस्थेचे जितेंद्र शिर्के यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सादर केलेली वाहनांची आणि अपघाताची आकडेवारी उपस्थित सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी ठरली. भारतात दरवर्षी रस्ते अपघातात सुमारे दोन लाख नागरिकांचा मृत्यू होतो. भारतात दर एका मिनिटाला अपघातात एक जण जखमी होतो. तर दर चार मिनिटाला एक अपघाती मृत्यू होतो. भारतात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी मद्यपान करून ७ टक्के अपघात होतात. दरवर्षी मृत्यूमुखी पडणाऱ्या एकूण अपघातातील ५४ टक्के मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींचे वय हे १८ ते ३५ च्या घरात आहे. म्हणजेच भारताची भावी पिढी अपघातात संपत आहे. इंग्लडमध्ये दरवर्षी होणाऱ्या अपघातातील मृतांची संख्या २१७५ ( ६.२ टक्के) इतकी, अमेरिकेत ३१६६ ( १३.६), तर जर्मनीत ३५२० (६.९) इतकी आहे. याउलट भारतात वर्षाकाठी मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या सुमारे दोन लाखांच्या घरात आहे.
वाहनसंख्या सर्वांत कमी, अपघाती मृत्यू मात्र सर्वाधिक
By admin | Published: September 27, 2015 12:09 AM