नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रु ग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या रूग्ण वाढीने प्रचंड मोठा टप्पा गाठला. मात्र जिल्ह्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रारंभीचे तीन महिने अत्यल्प तर त्यानंतरच्या दोन महिन्यांत बऱ्यापैकी वाढले. परंतु, सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून वाढत गेलेल्या जिल्ह्यातील मृत्यू संख्येने तब्बल ४९८ चा आकडा पार करून सर्व यंत्रणेला हादरून सोडले होते. नाशिक जिल्ह्यात पहिला रु ग्ण मार्च महिन्यामध्ये आढळला मात्र पहिला रु ग्ण सापडल्यानंतर तो १४ दिवसांनी खडखडीत बरा होऊन घरी गेला. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र उत्तरार्धात कोरोना बाधित बारा जणांचा बळी गेला तर मे महिन्यात त्यात दोनने वाढ होऊन चौदा नागरिक मृत्युमुखी पडले. जून महिन्यात प्रथमच मृतांच्या संख्येने तीन आकडी संख्या ओलांडत १६६ चा आकडा काढला. जुलै महिन्यात तब्बल २६१ नागरिक मृत्युमुखी पडले तर आॅगस्टमध्ये त्यात पुन्हा शंभराहून अधिक बळींची भर पडत हा आकडा ३७३ वर पोहोचला सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाने जवळपास पाचशेची मजल मारली होती. महिन्याला पाचशे बळींचे प्रमाण कुणाही नागरिकाला भितीदायकच वाटू लागले होते.त्यानंतर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयÞापासून रु ग्णवाढीचे तसेच मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत असल्याचे दिसून आले.अॅक्टीव्ह रुग्णसंख्येतही घटसप्टेंबरमध्ये अॅक्टीव्ह अर्थात उपचारार्थी रु ग्णांची संख्या दहा हजाराच्या उंबरठयÞावर जाऊन पोहोचली होती. तीदेखील हळूहळू कमी होत ८ आॅक्टोबरला ९ हजाराच्या खाली आल्याने या प्रमाणातही काहीशी घट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासकीय स्तरावरून देखील कोरोना चा कहर आता हळूहळू कमी होऊ लागल्याचे अधिकृत रित्या सांगितले जात असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे .उपचाराला उशीर बेततो जीवावर !सहा महिन्यांपासून सातत्याने कोरोनाच्या लक्षणांबाबतचा प्रचार होत असूनही काही नागरिक आपल्याला व्हायरल फिव्हर असेल, अशी मनाची समजूत करु न घेत घरगुती उपचार किंवा स्वत:च मेडीकलमधून गोळया आणून उपचार करतात. मग आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर त्रास खूप वाढल्यावर मग कोरोनावरील उपचारांसाठी धावाधाव करतात. शरीरातील आॅक्सिजनची पातळी तोर्पयत खालावली असल्यास मग संबंधित रु ग्णाच्या जीवावर बेतण्याचे प्रकार घडत असून वेळीच वैद्यकीय सल्ला न घेणाऱ्यांच्याच मृत्युचे प्रमाणदेखील मोठे असल्याचे निदर्शनास येत आहे.फोटो- १२ कोरोना ग्राफ