दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला केला मात्र या बालकाच्या आई व आजीने मोठ्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका केली. या हल्लयात जखमी झालेल्या बालकावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी सायंकाळी राहूल पंजा गायकवाड व कुटुंबीय शेतात काम करीत होते. त्यांच्यासोबत तीन वर्षाचा चेतन राहूल गायकवाड हाही खेळत होता. शेतालगत बिबट्याचे एक लहान बछडे दिसले मात्र सुरूवातीला ते मांजर असावे असे वाटल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही वेळाने बिबट्याची मादी आली आणि तिने चेतनवर हल्ला केला. यावेळी चेतनच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई व आजी यांनी धाव घेतली. आईने बिबट्यावर झेप घेत बाळाला सोडण्याचा प्रयत्न केला तर आजी अलका गायकवाड यांनी हातानेच बिबट्याला मारले. दरम्यान आरडओरडा होत असल्याने शेतकरी जमा झाले व बिबट्याने चेतनला जबड्यातून सोडत उसाच्या शेतात धूम ठोकली.जखमी झालेल्या चेतन यास तातडीने एका खासगी रु ग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले . त्यानंतर त्याला ग्रामीण रु ग्णालयात नेण्यात येऊन त्यास अधिक उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले.त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.आमदार नरहरी झिरवाळ यांनी ग्रामीण रु ग्णालयात जाऊन जखमी बालकाची विचारपूस करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचाराबाबत सूचना केल्या. वनविभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यापिंपळगाव केतकी शिवारात कादवा व कोलवण या नद्यांच्या परिसरातील उसाच्या क्षेत्रात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. पंधरा दिवसांपूर्वीच एक बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आले होते. मात्र अजूनही परिसरात बिबटे असून वारंवार मागणी करूनही त्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे . वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपळगाव केतकीचे उप सरपंच विनोद देशमुख,बाजार समितीचेउप सभापती अनिल देशमुख यांनी केले आहे.आमदार नरहरी झिरवाळ यांनीही नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवित बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.यावेळी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे ,दिंडोरीचे उपनगराध्यक्ष कैलास मवाळ,पिंपळगाव केतकीचे उपसरपंच विनोद देशमुख ,नगरसेवक माधव साळुंखे,सदाशिव गावित,राजू उफाडे,शिवाजी जाधव,प्रशांत पाटील आदि उपस्थित होते.फोटो : ०२चेतन गायकवाड
आई व आजीच्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 9:37 PM
दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला केला मात्र या बालकाच्या आई व आजीने मोठ्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका केली. या हल्लयात जखमी झालेल्या बालकावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील घटनाजखमी बालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार