ठळक मुद्देमुलाची प्रकृती चिंताजनक
नांदगाव : जळगाव खुर्द येथील सरोदे कुटुंबातील मुलाने व आईने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात आईचा मृत्यू झाला तर मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.गणेश मधुकर सरोदे (३०) व त्यांची आई मंदाबाई मधुकर सरोदे (६०) रा. जळगाव खुर्द, ता. नांदगाव या दोघा आई व मुलगा यांनी घरघुती भांडणात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गणेश सरोदे व त्याच्या आईचे जोरदार भांडण झाले, या भांडणात दोघांनी विषारी औषध घेतले. त्यांना उपचारास नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.