लासलगाव - जीवनात दु:ख, संघर्ष येत असतो पण दु:खाची जाणीव झाली तर दु:खालाच रंगवता आले पाहिजे. आपली आई हेच आपले विद्यापीठ असतं त्यामुळे माझ्या आईने मला घडविण्याचे , लढायचं बळ दिलं म्हणून मी आज इथपर्यंत पोहचलो असे प्रतिपादन कवि ऐश्वर्य पाटेकर यांनी येथील विद्यालयात मराठी राजभाषा दिनप्रसंगी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क.का.वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिरसाट , प्रा. पगार, पर्यवेक्षक ढोमसे उपस्थित होते. यावेळी पाटेकर म्हणाले की, तुझ्या कवितेच्या पुरस्कारानं जर मला भाकरी थापता आल्या तर बरं झालं असतं. ‘भाकर आणि फार्स ’ या कवितेने विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. कार्यक्र माच्या प्रारंभी मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून कवीश्रेष्ठ वि.वा शिरवाडकर व सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी मराठी भाषा काल आणि आज, व कविवर्य कुसुमाग्रज या विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्य विकास शिरसाट, भरत पगार, बाबाजी ढोमसे, विजय माळी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोविंद कुशारे, साहेबराव गुंजाळ, भिमराज काळे, नारायण दरेकर, अरु ण खांगळ ,सचिन ढोली,शकुंतला बनकर ,शितल फल्ले, अरु ण इंगळे उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानेश्वर भालेराव, किरण संधान यांनी केले. तर सुत्रसंचलन निवृत्ती गायकवाड तर आभार प्रदर्शन ढोमसे यांनी केले.
आई हेच विद्यापीठ : ऐश्वर्य पाटेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 2:57 PM