पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत हद्दीत गेल्या काही मिहन्यात पासून गाड्या चोरी करणार्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. केवळ पिंपळगाव भागातून गेल्या गेल्या वर्षभरात ३६मोटारसायकल गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत यात ८ गाड्या हस्तगत केल्या असून उर्विरत २८ गाड्याचा अद्यापही शोध लागलेला नाही.पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४गावांचा समावेश असून केवळ ३६ कर्मचार्यांवर अवलंबून असलेल्या२४गावांच्या कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून पिंपळगाव सारख्या बडयाशहरचा वाढता विस्तार बघून संख्या बळ नसल्याने गुन्हेगारीला उत येत आहे.त्यामुळे दिवसाढवळ्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत आहे यात होंडा,शाईन ,व बजाज या गाड्यांना चोरांकडून अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. मागणी तसा पुरवठा या सूत्रानुसार गतिमान पल्सर मोटर सायकल सध्या त्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून मोटारसायकल पार्क करावी असे आवाहन पोलिसांमार्फत केले जात आहे.या भागांमध्ये गेल्या काही मिहन्यांपासून मोटर सायकल चोरांचा सुळसुळाट झाला असून रस्त्यावर असो वा इमारतीच्या आवारात, महाविद्यालयात असो अथवा शाळेत,किव्हा शासकीय कार्यालय त्यांच्या निशाण्यावर असलेली गाडी ते सहजासहजी उडवत आहेत.
मोटर सायकल चोरीच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 5:45 PM