नाशिक : शाळांचा हंगाम सुरू होताच मुलांच्या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी पालकांची बाजारात गर्दी दिसू लागली आहे. नाशिक शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, सिडको, सातपूर, नाशिकरोड येथील बाजारपेठा शालेय साहित्यांनी फुलून गेल्या असून, लहान मुलांची दप्तरे, वह्या, पाण्याची बॉटल, छत्री आणि रेनकोट या शालेय साहित्यांवर यंदा मोटू-पतलू, डोरेमॉन, मिनियन्स या नेहमीच्या व्यक्तिरेखांसह यंदा अव्हेंजर्समधील पात्रांची छाप दिसून येत आहे.सोमवार (दि.१७ ) पासून शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विकेण्डची संधी साधून विद्यार्थ्यांसोबतच दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी त्यांच्या पालकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले. लहान मुलांच्या शालेय वह्या, कंपास पेटी, पाण्याच्या बाटल्या, डबे आणि रेनकोट यांसारख्या साहित्यावर अॅव्हेंजर्स एन्ड गेम’ या सिनेमातील पात्रांची चित्रे असल्याचे पहायला मिळत आहेत. शाळकरी मुलेही या चित्रपटाच्या पात्रांची छाप असलेल्या वस्तूंची मागणी करताना पहायला मिळाले. पेन्सिल, पट्टी, पेन, वह्या, पाण्याच्या बाटल्या, छत्र्या आणि रेनकोट यावर छोटा भीम, कॅप्टन अमेरिका, मोटू- पतलू तसेच शिन चॅन या नेहमीच्या पात्रांची यंदाही छाप आहे. डोरेमॉन, बार्बी, निंजा हातोडी, टॉम आणि जेरी या कार्टूनची चित्रे असणाऱ्या दप्तरांनाही पसंती मिळत आहे.रेनकोट, छत्र्यांवरही कार्टून्सची छापशाळेच्या नवीन वर्षासोबतच पावसाळाही सुरू होत असल्याने शालेय साहित्यासोबतच छत्री आणि रेनकोट विकत घेण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या पालकांकडे हट्ट करताना दिसू येत आहेत. यामध्ये पोलका डॉट्स, विविध कार्टून असलेल्या लहान मुलांच्या आकर्षक छत्र्या आणि रेनकोट पहायला मिळत आहे. या छत्र्यांची विक्री किंमत १५० रुपयांपासून पुढे आहे.
शालेय साहित्यावर मोटू-पतलू, डोरेमॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:54 PM