शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

पंचवटीत शोककळा : नगरसेविका शांताबाई हिरे यांनी संपविला जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:21 PM

खुपदा दार वाजविले, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या राहत्या घरावर मुलगा चढला अणि वरून जेव्हा त्याने घरात प्रवेश केला तेव्हा हिरे या बेशुद्धावस्थेत आढळल्या.

ठळक मुद्देआजारपणाला कंटाळून काहीतरी विषारी औषध प्राशन मनपा अग्निशमन दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करत मानवंदना

नाशिक : अत्यंत साधा स्वभाव, पण आपल्या कणखर आवाजात प्रभागातील नागरी समस्या तितक्याच पोटतिडकीने महापालिकेच्या सभागृहात मांडणाऱ्या ६१ वर्षीय शांताबाई बाळू हिरे (रा.राहुलवाडी, पेठरोड) यांनी आपल्या राहत्या घरी रविवारी (दि.२९) दुपारी आजारपणाला कंटाळून काहीतरी विषारी औषध प्राशन करून आपला जीवनप्रवास संपविला. त्यांच्या निधनाची बातमी पंचवटी प्रभाग क्रमांक ४मध्ये पसरताच नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हिरे या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना आठवडाभरापूर्वीच एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. रविवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी कोणी नसताना त्यांनी घराची दारे, खिडक्या बंद करून घेत काहीतरी विषारी औषध सेवन केले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास जेव्हा त्यांचे नातेवाईक घरी आले तेव्हा घराचा दरवाजा आतमधून हिरे उघडत नव्हत्या. खुपदा दार वाजविले, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या राहत्या घरावर मुलगा चढला अणि वरून जेव्हा त्याने घरात प्रवेश केला तेव्हा हिरे या बेशुद्धावस्थेत आढळल्या. मुलाने तत्काळ दरवाजा उघडून हिरे यांना उचलून रुग्णालयात नातेवाइकांच्या मदतीने हलविले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. हिरे यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे, असा परिवार आहे. २०१७साली हिरे या भाजपाच्या तिकिटावर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. मागील दोन ते अडीच वर्षांपासून हिरे या पंचवटीच्या प्रभाग-४चे प्रतिनिधित्व करत होत्या. प्रभागातील समस्यांबाबत त्या नेहमीच जागरूक राहत होत्या. मनपाच्या सभागृहात त्या आपल्या साध्यासोप्या पद्धतीने नैसर्गिकरीत्या समस्यांची मांडणी करत लक्ष वेधून घेत होत्या. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा रात्री साडेनऊ वाजता पंचवटी अमरधाममध्ये पोहोचली. यावेळी मनपा अग्निशमन दलाच्या वतीने पंचवटी अग्निशमन उपकेंद्रप्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करत मानवंदना दिली. शोकाकुल वातावरणात हिरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDeathमृत्यू