शहरातील मध्यवस्ती भागात म्हणजेच सीबीएस ते अशोकस्तंभ आणि महात्मा गांधी रोड येथे कोठेही वाहनतळ नाही. त्यामुळे न्यायालय तसेच अन्य शासकीय कार्यालये आणि बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल होतात. त्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीअंतर्गत बीओटी तत्त्वावर महात्मा गांधी रोडलगतच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे भुयारी पद्धतीने वाहनतळ तयार करण्याचा प्रकल्प आखण्यात आला होता. स्मार्ट सिटी कंपनीने त्यासंदर्भात जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यावर जिल्हा परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांचा आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेकडून नकार मिळाल्याचे स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांनी सांगितले होते, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अशाप्रकारचा प्रस्ताव आला नसल्याचे नमूद केले होते. दरम्यान, आता त्यानंतरदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्मार्ट सिटी कंपनीने जिल्हा परिषदेशी केलेल्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवले आहे. यासंदर्भात संयुक्त बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
इन्फो...
असा आहे प्रकल्प
* १२१ कोटी रुपयांचा स्मार्ट सिटीअंतर्गत बीओटी प्रकल्प
* भुयारी पद्धतीने वर स्टेडियम आणि खाली मोटारींसाठी वाहनतळ
* ८०० मोटारींची वाहनतळात क्षमता
कोट...
दिल्लीमध्ये दोन ठिकाणी अशाप्रकारचे भुयारी वाहनतळ आहे. नाशिकमध्ये मध्यवर्ती भागात अशाप्रकारे एक जरी वाहनतळ तातडीने झाले तर सीबीएस आणि एमजी रोड, मेनरोड परिसरातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटू शकेल.
- सतीश कुलकर्णी, महापौर
----------
सूचना :
जिल्हा परिषदेचे स्टेडियम किंवा शनिवारी प्रशांत खरोटे यांनी दिलेले एमजीरोडवर वाहनांच्या कोंडीचे फोटो डेस्कॅनवर आहेत.