शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

... प्रसंगी दिल्लीचे तख्तही हलवू : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:52 AM

कांद्यांच्या संदर्भातील सरकारचे धोरण हे शेतकरी आणि कांद्याचे हिताचे अजिबातच नाही, असे प्रसंग वारंवार समोर आल्यानंतरही सरकारला जाग येत नसेल आणि कांद्याला जीवनाश्यक वस्तूंंच्या यादीतून वगळणार नसेल तर प्रसंगी दिल्लीचे तख्तही हलविण्याची आमची ताकद आहे,

नाशिक : कांद्यांच्या संदर्भातील सरकारचे धोरण हे शेतकरी आणि कांद्याचे हिताचे अजिबातच नाही, असे प्रसंग वारंवार समोर आल्यानंतरही सरकारला जाग येत नसेल आणि कांद्याला जीवनाश्यक वस्तूंंच्या यादीतून वगळणार नसेल तर प्रसंगी दिल्लीचे तख्तही हलविण्याची आमची ताकद आहे, असा इशारा प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिला.प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिकरोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी कडू यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी धोरणावर जोरदार टीका केली.शेतकºयांच्या बाबतीत सरकारची भूमिका ही नेहमीच विरोधाची राहिली आहे. शेतकºयांना आश्वासन द्यायचे मात्र त्याची अंमलबजावणी करायची नाही या भूमिकेमुळे सरकारने शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळी आणली, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी कांदा उत्पादक शेतकºयांप्रती कळवळा दाखविला होता. मात्र पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना दिलेला आश्वासनाचा विसर पडला, असा आरोप कडू यांनी केला.कांदा जीवनावश्यक वस्तुंमधून वगळावा यासाठी प्रहार जनशक्तीतर्फे संघर्ष करून शेतकºयांना न्याय मिळवून देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. आम्ही शेतकºयांसोबत किती प्रामाणिक आहोत हे आम्ही लवकरच दाखवून देऊ आणि येत्या निवडणुकांचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असे कडू म्हणाले. शेतीमालाच्या हमीभावप्रश्नावर कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेऊन आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. यावेळी बंडुभाऊ जंजाळ , मंगेश देशमुख यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.या परिषदेस शिवाजी चुंभळे, हंसराज वडघुले, नाना पाटील, परिषदेचे आयोजक शरद शिंदे, प्रमोद कुदळे, मंगेश देशमुख, अतुल खुपसे, सोलापूर जिल्हाप्रमुख दत्ता म्हस्के, परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे, नांदेड जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख, लातूर जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले, धुळे जिल्हाप्रमुख आप्पा बोरसे, जळगाव जिल्हाप्रमुख विजय भोसले, नंदुरबार जिल्हाप्रमुख बिपीन पाटील, औरंगाबाद जिल्हाप्रमुख सुधाकर शिंदे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, किकवारीचे सरपंच केदारबापू काकुळते आदी उपस्थित होते. चांदवड तालुक्यातील गणेश निंबाळकर यांनी कांदा परिषद घेण्यामागचा उद्देश विशद केला.‘सन्मान’ नव्हे ‘अपमान’ योजनाकेंद्र सरकारच्या शेतकºयासाठी असलेल्या योजना हा फसव्या असूून, ‘शेतकरी सन्मान योजना’ हीदेखील ‘अपमान योजना’ असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. सदर योजना ही दिशाभूल करणारी योजना आहे. या योजनेचा निषेध करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गनिमी कावा करू, पण शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडू, असा इशारा शेवटी कडू यांनी दिला.कडू बचावले...शेतकरी आणि कांद्याच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी परिषद आयोजित करण्यात आल्याने जिल्हाभरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समोर उपस्थित शेतकºयांप्रमाणेच व्यासपीठावरदेखील पक्षाची नेतेमंडळी आणि पदाधिकाºयांची गर्दी झाली होती. लांबलचक व्यासपीठावर चांगलीच गर्दी झाली होती. आमदार बच्चू कडू भाषण आटोपल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरत असताना स्टेजचा एक भाग कोसळल्याने कडू बचावले. व्यासपीठावरील काही पदाधिकारी व्यासपीठावरून पडल्याने किरकोळ जखमी झाले.दानवेंचा पराभव  हेच ध्येयभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकºयांना साला म्हटले, अपशब्द वापरला. त्यांचा पराभव करणे हेच आपले राजकारणातील सर्वांत मोठे ध्येय असल्याचा पुनरुच्चार आमदार बच्चू कडू यांनी केला. दानवे यांच्या पराभवासाठी आपण काहीही करण्यास तयार असून, अर्जून खोतकर यांनी दानवेंविरोधात उमेदवारी केली, तर प्रसंगी त्यांना पाठिंबा देऊ, पण दानवेंचा पराभव करूच अशी गर्जना कडू यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाBachhu Kaduबच्चू कडू