शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

निर्बंध शिथिल झाल्यानंतर कॉँग्रेसचे आंदोलन

By admin | Published: January 05, 2017 2:02 AM

नोटाबंदी : गुजरातहून खास निरीक्षक दाखल

नाशिक : नोटाबंदीनंतरच्या आर्थिक निर्बंधांसाठी दिलेल्या पन्नास दिवसांची मुदत संपल्यानंतर आता कॉँग्रेसला जाग आली असून, आंदोलन जोरात झाले पाहिजे, यासाठी खास निरीक्षक पाठविण्यात आले आहेत. या आंदोलनाचा अहवाल राष्ट्रीय नेत्यांकडे पाठविला जाणार असल्याने कॉँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर बॅँका आणि एटीएममधून रोकड काढण्यावर निर्बंध घातले होते. पन्नास दिवस हे निर्बंध राहतील असे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, नोटाबंदीनंतर बॅँकात खाते असलेल्या आणि एटीएम कार्ड असलेल्या खातेदारांपेक्षा बॅँकेत खाते नसलेल्या तळागाळातील वर्गाचे खूप हाल झाले. ग्रामीण भागातील बॅँकांपर्यंत रोकड न आल्याने तेथील अर्थव्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम झाला. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून, आता कॉँग्रेसने आंदोलनाची घोषणा केली आहे. कॉँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ६ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे आणि रविवारी म्हणजेच ८ तारखेला घंटानाद आंदोलन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून गुजरात येथील डॉ. कमलेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी बुधवारी सकाळी कॉँग्रेस भवनात बैठक घेतली. त्यानंतर आता कॉँग्रेस कार्यकर्ते कामाला लागले आहेत.कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी यापूर्वी एक मोर्चा काढला होता. त्यात विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यात यश आले नव्हते. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आंदोलन करावे लागणार असून, त्यामुळेच कार्यकर्ते कामाला लागले आहेत. (प्रतिनिधी)