लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : तूर खरेदी प्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याचा प्रथम त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने रस्त्यावर उतरून निषेध केला. त्यानंतर शुक्रवारी विरोधी पक्षांनाही जाग आल्याचे बघायला मिळाले. सटाण्यात कॉँग्रेसतर्फे बसस्थानकासमोर यज्ञ पेटवून साक्री- शिर्डी महामार्ग रोखून धरत शहराध्यक्ष किशोर कदम यांनी सोवळे नेसून दानवे यांना सुबुद्धी यावी म्हणून यज्ञ पूजा करून अनोख्या पद्धतीने गांधीगिरी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे यांच्या वक्तव्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. आज सटाणा शहर कॉँग्रेसचे पदाधिकारीही रस्त्यावर उतरले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास खासदार दानवे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत शहरातील बसस्थानकासमोर यज्ञ पेटवून साक्री-शिर्डी महामार्ग रोखून धरला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी दानवे यांची भाषा दानवासारखी असल्याची टीका केली. त्यांच्या डोक्यात सत्तेची नशा भिनली आहे. त्यांच्या या राक्षसी वृत्तीचा नाश होऊन त्यांना सुबुद्धी मिळावी म्हणून आपण यज्ञ करत असल्याचे सांगितले. कदम यांनी सोवळे नेसून यज्ञ पूजा करून अनोख्या पद्धतीने गांधीगिरी केली. या आंदोलनामुळे वीस मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात शहराध्यक्ष कदम यांच्यासह नगरसेवक दिनकर सोनवणे, राहुल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब कापडणीस, मनोज ठोळे, भगवान बच्छाव, चंद्रकांत सोनवणे, बब्बू शेख, सुरेश कंकरेज, प्रकाश कापडणीस, भगवान सोनवणे, हिरामण सोनवणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.दिंडोरीत पुतळ्याचे दहनदिंडोरी : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ आज दिंडोरी येथे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, उपतालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, शहरप्रमुख रमेश बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली पालखेड चौफुली येथे रास्ता रोको करत दानवेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी अरुण वाळके, पांडुरंग गणोरे, विभागप्रमुख विजय पिंगळ, गणप्रमुख रावसाहेब जाधव, युवा सेना उपतालुकाप्रमुख नीलेश शिंदे, सदाशिव गावित, नदीम सय्यद उपस्थित होते. येवल्यात जोडे मारलेयेवला : तूर खरेदीसंदर्भात जालन्यातील मेळाव्यात कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांदरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले. या त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येवल्यातील संतप्त शिवसैनिकांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता येथील विंचूर चौफुलीवर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. ‘रावसाहेब दानवे हाय हाय!, दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी’ अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपा केंद्रात व राज्यात सत्तेवर आहे. रावसाहेब दानवे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तरीदेखील दानवे हे शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य करतात. जालना येथे कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांविषयी वक्तव्य केले. याबाबत शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी येवल्यातील शिवसैनिकांनी केली.शेतकऱ्यांबाबतीत अवमानकारक बोलणाऱ्या दानवेंचा शिवसेनेच्या वतीने येवल्यात निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसीलदार नरेश बहिरम यांना देण्यात आले. निवेदनावर शिवसेना नेते संभाजी पवार, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, रूपचंद भागवत, वाल्मीक गोरे, कांतीलाल साळवे, मंगेश भगत, विठ्ठल आठशेरे, विठ्ठल महाले, दिलीप मेंगाळ, मकरंद सोनवणे, नगरसेवक दयानंद जावळे, सुदाम पडवळ, भास्कर येवले, रतन बोरनारे, अमोल सोनवणे, अरु ण देवरे, भागीनाथ थोरात, महेश सरोदे, राहुल लोणारी, अमित अनकाईकर, रशीद शेख आदींसह सुमारे शंभर शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज्यातील विविध ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत असताना उर्वरित शेतकऱ्यांबाबत वाईट बोलण्यामुळे शेतकरी दुखावला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दानवेंच्या पुतळ्याला जोडे मारा आंदोलन
By admin | Published: May 13, 2017 12:00 AM