दिंडोरी : ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पंचायत समिती येथे सरचिटणीस उज्ज्वल गांगुर्डे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढाकणे, उपाध्यक्ष विष्णुपंत अहेर, सचिव उफाडे यांच्यासह दिंडोरी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत कक्ष अधिकारी काटकर यांना निवेदन देण्यात आले.तालुकास्तरावरील ग्रामपंचायत कर्मचाºयांना अद्यापही नियमानुसार वेतन मिळत नसून मागील वेतन उशिरा अदा करण्यात आले होते. वेतन व राहणीमान भत्ता-फरक कर्मचाºयांना अद्यापही मिळालेला नाही. शासनाने लागू केलेल्या विविध सेवा-सवलतींचा अद्यापपावेतो लाभ मिळाला नाही. मागण्यांसाठी अधिकारीवर्गाकडे साकडे घातले मात्र तोंडी आश्वासन मिळाले ठोस पाउल उचलले नाही. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचारीवर्गाने धरणे आंदोलन केले असल्याचे सांगण्यात आले आहे.शासन नियमाप्रमाणे कर्मचाºयांना लागू झालेल्या विविध सेवा सवलतींची ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाºयांवर अन्याय होत आहे . याबाबत दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिंडोरी येथे कर्मचाºयांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:20 PM