नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये गनिमी काव्याने आंदोलनाला सुरु वात केली आहे. या आंदोलनाची सूत्र आता महिलांनी हाती घेतली असून, शुक्रवारी (दि.२७) गोदावरी नदीपात्रात उतरून आंदोलन केले. तर काही महिलांनी बाणेश्वराला दुग्धाभिषेक करून सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. नाशिक जिल्ह्यात मराठा क्र ांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू असताना प्रशासनाने ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारत मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांना आंदोलन करू नये यासाठी नोटिसा पावविल्याने महिला समन्वयकांनी आंदोलनात पुढाकार घेत आंदोलनाची धुरा सांभाळली आहे. मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत गुरुवारी (दि.२६) यापुढे नाशिक जिल्ह्यात आंदोलनाचे नेतृत्व महिला सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्र वारी सकाळी महिलांनी गोदावरी परिसरात आंदोलन करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यास गुुरुवारी प्रतिबंध करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलकांनी सत्र न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आवारात ठाण मांडून आंदोलनास सुरु वात केली. येथेही सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. त्यामुळे शुक्र वारपासून गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला असून, आंदोलनासाठी प्रशासन जागा आणि परवानगी देत नाही. त्यामुळे आता आंदोलन कुठे आणि कसे सुरू आहे ते शोधा, असा इशारा मराठा क्र ांती मोर्चाने दिला होता. त्यामुळे पोलिसांची प्रशासनाची पुरुष समन्वयकांवर नजर होती. परंतु, मराठा क्रांती मोर्चाच्या महिलांनी शुक्रवारी बाणेश्वर मंदीर परिसरात माधवी पाटील व पूजा धूमाळ, मनोरमा पाटील या महिलांनी अचानक गनिमा कावा पद्धतीने गोदावरीच्या पात्रात उतरून आंदोलन करीत मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली, तर मंगला शिंदे, शोभो सोनवणे, अरुणा डुकरे, अस्मिता देशमाने आदींनी बाणेश्वराला दुग्धाभिषेक करीत सरकारविरोधात घोषणाबाजी करून मराठा आरक्षणाची मागणी केली. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.आमदारांच्या निवासस्थानी आजपासून ठिय्यामराठा क्र ांती मोर्चातर्फे शनिवारपासून (दि. २८) आमदारांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चातर्फे आतापर्यंत रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, जलसमाधी आंदोलन करण्यात आले असून, आता मराठा क्रांती मोर्चा भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी प्रथम ठिय्या आंदोलन करणार आहे. राज्यात भाजपाचे सरकार असल्याने आमदारांच्या निवासस्थानाबाहेरील ठिय्या आंदोलनाची सुरुवात सानप यांच्या निवासस्थानापासून करण्यात येणार असून, शनिवारी सकाळी १० वाजता जुना आडगाव नाका, कृष्णनगर या ठिकाणी त्यांच्या कार्यालय व निवास ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्र ांती मोर्चातर्फे देण्यात आली आहे.
महिलांचे गोदावरीपात्रात उतरून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:16 AM