गेल्या आठवड्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनंतर दूषित पाणीपुरवठा झाल्याचा दावा जनता दलाने केला आहे. यामुळे शहरात डायरिया व साथीच्या रोगाचे रुग्ण आढळून येत आहेत. पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या कामांकडे स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या आयुक्त गोसावी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, मनपा आयुक्त गोसावी कार्यालयात हजर राहत नसल्याचा आरोपही जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
इन्फो
आश्वासनानंतर आंदोलन मागे
डायरिया रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून शहरात तातडीने सर्वेक्षण केले जाईल, वाडिया, अलीकबर रुग्णालयात उपचार केले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात जनता दलाचे नगरसेवक मुस्तकींम डिग्निटी, शान हिंद आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो- ०२ मालेगाव जनता दल
मालेगाव मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या दालनाबाहेर आंदोलन करताना जनता दलाचे नगरसेवक मुस्तकींम डिग्निटी, शान ए हिंद व अन्य पदाधिकारी.
===Photopath===
020621\02nsk_41_02062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०२ मालेगाव जनता दलमालेगाव मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या दालनाबाहेर आंदोलन करतांना जनता दलाचे नगरसेवक मुस्तकींम डिग्निटी, शान ए हिंद व अन्य पदाधिकारी