मालेगाव : उड्डाणपुलाच्या कामामुळे जुना आग्रारोडवर वाहनधारकांचे होत असलेले हाल व पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेच्या निषेधार्थ अवामी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी व अनोख्या पद्धतीने आंदोलन करून महापालिका प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.पहिल्याच पावसात शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना चिखलातून रस्ता करावा लागत आहे. तसेच जुना आग्रारोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सदर काम करीत असताना ठेकेदाराने सर्व्हिस रस्ता बनविला नाही. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात उडी मारून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.पावसामुळे वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ अवामी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांच्यासह पदाधिकाºयांनी जुना आग्रारोडवर फुलांचा वर्षाव करीत व चिखलामध्ये लोटांगण घेत आंदोलन केले. तसेच खड्ड्यांमधून मार्गक्रमण करणाºया वाहनचालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
मालेगावी खड्ड्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:33 AM
मालेगाव : उड्डाणपुलाच्या कामामुळे जुना आग्रारोडवर वाहनधारकांचे होत असलेले हाल व पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेच्या निषेधार्थ अवामी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी व अनोख्या पद्धतीने आंदोलन करून महापालिका प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.
ठळक मुद्देमहापालिकेविरुद्ध रोष रस्त्यांच्या दुरवस्थेचा निषेध