याबाबत संघटनेचे अध्यक्ष सतीश कजवाडकर, उपाध्यक्ष वालचंद छाजेड, सचिव राकेश दिडवानिया यांनी पदाधिऱ्यांसह कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले व जीएसटी संदर्भात अडचणी मांडल्या. कृषिमंत्री भुसे यांनी याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कजवाडकर यांनी सांगितले, जीएसटी कायद्यात होणारे बदल शासनाने थांबवून, इंटरनेट सुविधा व जीएसटी पोर्टलवरील सुविधा विनाव्यत्यय सुलभतेने सर्वांना मिळेल, असे नियोजन करावे. ज्यामुळे सर्वांना कामकाज करणे सुलभ व सोयीचे होईल. याप्रसंगी विक्रम मेहता, सतीश कासळीवाल, राजेश जाखोटीया, पुरुषोत्तम तापडे, राकेश ओस्तवाल, भरत शहा, प्रदीप जैन, जयंत मोरे, सतीश शुक्ल, सचिन लोढा, राणीदास बोथरा, विमल जैन, बिपीन लोढा, जुगल दायमा, मनोहर अमृतकर, प्रभात शहा, रमेश मालपाणी आदींनी काळ्या फिती लावून निवेदन दिले.
मालेगावी कर सल्लागार संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 7:52 PM
मालेगाव : येथील कर सल्लागार संघटनेच्या वतीने जीएसटी कायद्यातील नियमात होणाऱ्या वारंवार बदलामुळे व्यापाऱ्यांसह, करसल्लागार, सीए यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचा मनस्ताप होत असल्याने त्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने राज्य वस्तू व सेवा कर कार्यालयाचे मालेगावचे उपआयुक्त (प्रशासन) राजेंद्र पाटील, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिकारी, आयकर कार्यालयाचे वॉर्ड १ चे अधिकारी अनिल गुरव यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्दे जीएसटी कायद्यात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे नाराजी