देवळा : मातंग समाजाचे विविध गटात वर्गीकरण व्हावे तसेच आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या बीड जिल्ह्यातील संजय नाकतोडे याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी देवळा तालुका लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विंचूर प्रकाशा महामार्गावरील मालेगाव नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सुनीता परदेशी यांना निवेदन देण्यात आले. एक तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.गुरु वार दि. 7 रोजी बीड जिल्ह्यातील मातंग समाजाचे अ ब क ड वर्गीकरण व्हावे तसेच या मागणीसाठी संजय नाकतोडे या तरु णाने बिंदुसरा प्रकल्पात जलसमाधी घेतल्याने त्याचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. यासाठी नाकतोडे यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रु पये भरपाई द्यावी, कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे तसेच या सर्व बाबींसाठी मुख्यमंत्री जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी देवळा तालुका लहुजी शक्ती सेनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संघटक दीपक पानपाटील यांच्या नेतृत्वाखाली विंचूर प्रकाशा महामार्गावरील मालेगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर नायब तहसीलदार सुनीता परदेशी यांना निवेदन देण्यात येऊन आंदोलन स्थिगत करण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष सुनील साबळे, भाऊसाहेब साबळे, दादाजी साबळे, सुनील पान पाटील, दिगंबर साबळे, नानाजी साबळे, गुलाब साबळे, समाधान साबळे, गणेश साबळे, किशोर बेंद्रे, संदीप अिहरे, प्रभाकर साबळे, संदीप थाटशृंगार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मातंग समाजाचे देवळा येथे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 6:15 PM
देवळा : मातंग समाजाचे विविध गटात वर्गीकरण व्हावे तसेच आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या बीड जिल्ह्यातील संजय नाकतोडे याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी देवळा तालुका लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विंचूर प्रकाशा महामार्गावरील मालेगाव नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सुनीता परदेशी यांना निवेदन देण्यात आले. एक तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
ठळक मुद्देनायब तहसीलदार सुनीता परदेशी यांना निवेदन देण्यात येऊन आंदोलन स्थिगत