नाशिक : विधान परिषद आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवरून हजर होताच बदल्यांवर शिक्कामोर्तब होईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस आणि मुलांच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्याची बाब विचारात घेऊन प्रशासकीय बदल्या करू नये अशी भूमिका जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने घेतली आहे.जिल्ह्णात निवडणुकांमुळे सलग आचारसंहिता असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. २९ रोजी आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा बदल्यांची चर्चा सुरू झाली असून, प्रशासनाकडून बदल्यांची चाचपणी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. आचारसंहितेनंतर बदलीप्रक्रिया सुरू होण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने प्रशासनाला पत्र देऊन पावसाळ्यात होणारी गैरसोय आणि मुलांच्या शैक्षणिक वर्षाला झालेली सुरुवात याचा विचार करून बदलीची प्रक्रिया करावी, अशी मागणी केलेली आहे. प्रशासकीय बदली करताना कर्मचाºयांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडे विनंती करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले होते. ज्या बदल्या विनंती असतील त्या बदल्यांना संघटनेची हरकत नसली तरी प्रशासकीय बदल्यांमध्ये कर्मचाºयांची गैरसोय होऊ नये अशी संघटनेने भूमिका घेतलेली आहे.कर्मचारी संघटनेने प्रशासकीय बदली संदर्भातील भूमिका स्पष्ट केल्याने प्रशासकीय बदली प्रक्रिया संयमाने राबविली जाण्याची शक्यता आहे.पदनिहाय सेवाकाळाची माहिती संकलितआचारसंहिता शिथिल होताच जिल्हा परिषदेने कर्मचाºयांच्या पदनिहाय सेवाकाळाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले असल्याचे समजते. विशेषत: एकाच ठिकाणी अनेक वर्षं काम करणाºया कर्मचाºयांवर सर्वप्रथम बदलीची कारवाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अनेक तक्रारी असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने अशा कर्मचाºयांची फाईल मागविली असल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे सध्या रजेवर असल्याने ते रुजू होताच बदलीची फाईल त्यांच्यापुढे ठेवली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेकडून बदल्यांची हालचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:25 AM