एकलहरे : येथील २१० मेगावॉटच्या तीन संचांपैकी फक्त एकच संच सध्या सुरू आहे. बाकीचे संच टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील कामगार संघटनांच्या कृती समितीने काळ्या फिती लावून वीज केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशनचे राज्य सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी येथील कामगार व संघटना पदाधिकाºयांची भेट घेऊन चर्चा केली.येथील २१० मेगावॉटच्या तीन संचांपैकी फक्त एकच संच सध्या सुरू आहे. बाकीचे संच टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकलहरे येथे नवीन ६६० मेगावॉट प्रकल्प होत नाही तोपर्यंत आहे ते संच बंद करणार नाही. या संचांना रिपेअर व मेंटेनन्स (आर अॅन्ड एम) करून त्याची कार्यक्षमता १० ते १५ वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकते, त्याबाबत सकारात्मक पाऊले वीज मंडळ प्रशासनाने उचलावित अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असा इशारा कृष्णा भोयर यांनी दिला. यावेळी नारायण देवकाते, अरुण म्हस्के, हरिष सोनवण़े, वंदना चव्हाण, पोपट पेखळे, दत्तू घोडे, नारायण देवकाते, गांगुर्डे आदी उपस्थित होते.
वीज केंद्र कर्मचाऱ्यांचे प्रवेशद्वारावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:20 AM