भाऊसाहेबनगर : तालुक्यातील निफाड आणि रानवड साखर कारखाना हे दोन सहकार साखर कारखाने सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी शुक्र वारी सहकार मंत्री, लोकप्रतिनिधींसह मुंबई येथे बैठक घेतली. बैठकीत संबंधितांना यासंबंधी कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत.निफाड आणि रानवड दोन्ही बंद असलेले साखर कारखाने आम्ही सुरु करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. निफाडकरांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यामुळे राष्ट्रवादीचे दिलीपराव बनकर यांना विजयी केले. नाशिक आणि निफाड साखर कारखाना संदर्भात एक बैठकही मुंबईत झाली.ड्रायपोर्टचे माध्यमातून निफाड सुरु होणे शक्य असताना तेथील कार्यवाही संथ गतीने सुरु आहे, अशा पाशर््वभूमीवर तालुक्यात अस्वस्थता वाढु लागली होती.रंगपंचमीचे दिवशी अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम यांचेसह आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, सागर कुंदे यांचेसह बैठक घेतली .साखर आयुक्त बाजीराव शिंदे, उपजिल्हाधिकारी सागर, जिल्हा बॅकेचे मुख्याधिकारी खरे, जे.एन.पी.टी.चे अधिकारी ,सहकार आणि वित्त विभागाचे सचिव उपस्थित होते. ड्रायपोर्टसाठी निफाडची जागा खरेदी, निफाड कारखान्यांकडे येणे असलेला शासनाचा सेल्स टॅक्स यासंबंधी चर्चा झाली.टॅक्स भरणे आणि पोर्टसाठी जमीन हस्तांतरण याबाबत उचित कार्यवाही करणेची सुचना पवार यांनी दिल्या आहेत. यासंबंधी एप्रिल मिहन्यात पहिल्या आठवडयात बैठक होणार आहे.राज्यस्तरावर सुरु असलेल्या प्रयत्नातून दोन्ही कारखाने येत्या हंगामात सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुढील हंगामात तालुक्यात उसाचा क्षेत्र वाढणारं आहे अशावेळी या प्रयत्नांना वेग यावा अशी उत्पादकांची भावना आहे.
निफाड, रानवड साखर कारखाने सुरू करण्यासाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:56 PM