शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

समितीच्या मार्गदर्शनानुसार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:43 AM

नाशिक : तोडफोड, हिंसा वा आत्महत्या करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तर त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याबरोबरच सरकारच्या विरोधात अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्याचा मार्गच योग्य आहे़ आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांतर्फे समाजातील विचारवंताच्या परिसंवादाचे गुरुवारी (दि़ २) आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये समाजातील तज्ज्ञ व विचारवंताची ‘प्रोटोकॉल समिती’ स्थापन करण्यात येणार असून, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आरक्षणाचे पुढील आंदोलन केले जाईल, अशी माहिती डॉ़ संदीप कोतवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली़

ठळक मुद्देमराठा आरक्षण; समाजातील विचारवंतांचा परिसंवाद

नाशिक : तोडफोड, हिंसा वा आत्महत्या करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तर त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याबरोबरच सरकारच्या विरोधात अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्याचा मार्गच योग्य आहे़ आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांतर्फे समाजातील विचारवंताच्या परिसंवादाचे गुरुवारी (दि़ २) आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये समाजातील तज्ज्ञ व विचारवंताची ‘प्रोटोकॉल समिती’ स्थापन करण्यात येणार असून, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आरक्षणाचे पुढील आंदोलन केले जाईल, अशी माहिती डॉ़ संदीप कोतवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली़मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज आक्रमक झाला असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे़ यामध्ये काही ठिकाणी तोडफोडीचे तर तर काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरू आहे़ नाशिक जिल्ह्णातही मराठा आरक्षण आंदोलन सुरू असून, ते विखुरलेल्या स्वरूपात आहे़ त्यामुळे समाजातील सर्वांना एकत्र आणण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी गंगापूर रोडवरील सावरकरनगर (नंदनवन लॉन्स) येथे बुधवारी (दि़ १) पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान वा आत्महत्या करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही़ मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाचे नियोजन करतो; मात्र अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही़नाशिक जिल्ह्णातील मराठा समाजातील विचारवंतांच्या गुरुवारी होणाऱ्या या परिसंवादात लोकप्रतिनिधी, वकील, पोलीस, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील विचारवंत सहभागी होणार आहेत़ समाजातील सूज्ञ मंडळी, मान्यवरांचा समावेश असलेली एक प्रोटोकॉल समिती स्थापन करील व समितीच्या सूचनेनुसारच पुढील आंदोलने केली जातील़या परिसंवादामध्ये समाजातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते, त्यामुळे राजकीय, सामाजिक वा आर्थिक समूह वा गटापर्यंत ही समिती मर्यादित राहणार नाही़ तसेच समाजासाठी योगदान देणारे तसेच दिशा देणाºयांचा समावेश सवानुमते प्रोटोकॉल समितीत केला जाणार असल्याचे डॉ़ कोतवाल यांनी सांगितले़मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची सुयोग्य दिशा ठरविण्यासाठी होणाºया परिसंवादात समाजातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवकांना सहभागी होण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे.या पत्रकार परिषदेला चंद्रकांत बनकर, अक्षय झेंडे, प्रकाश चव्हाण, कल्याणी लोहोकरे, रसिका शिंदे, दर्शन सोनवणे, मुग्धा थोरात आदी उपस्थित होते.आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णयच्मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्णातील दोन आमदारांनी राजीनामा लिहून दिला आहे. या राजीनाम्यांचे पुढे काय झाले याबाबत परिसंवादात चर्चा होऊन त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे़ यामुळे सर्व समन्वयकांनी या परिसंवादात सहभागी होऊन आपली भूमिका मांडण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे.