शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

एमपीएतील ८१९ अधिकाऱ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:34 PM

नाशिक : ‘तंबाखूजन्य जर्दा, खर्रा आणि सिगारेट-बिडी धुम्रपानाच्या दुष्परिणामांची मला जाणिव आहे. मी, माझे कार्यालय, घर तसेच परिसर तंबाखूमुक्त राखेन, असा संकल्प करित महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील ८१९ प्रशिक्षणार्थी पोलीस उप-निरीक्षकांनी मंगळवारी (दि़५) तंबाखूमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. या अधिका-यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार यावेळी केला़

ठळक मुद्दे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी - ८१९ प्रशिक्षणार्थी पोलीस उप-निरीक्षकतंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार

नाशिक : ‘तंबाखूजन्य जर्दा, खर्रा आणि सिगारेट-बिडी धुम्रपानाच्या दुष्परिणामांची मला जाणिव आहे. मी, माझे कार्यालय, घर तसेच परिसर तंबाखूमुक्त राखेन, असा संकल्प करित महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील ८१९ प्रशिक्षणार्थी पोलीस उप-निरीक्षकांनी मंगळवारी (दि़५) तंबाखूमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. या अधिका-यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार यावेळी केला़

पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू मुक्त नाशिक मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक नंदकुमार ठाकूर, सहायक संचालक पराग जाधव, सत्रसंचालक राहूल खाडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय थिगळे, सहा.सयोजक नंदन बगाडे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत संबंध हेल्थ फॉऊंडेशन संस्थेचे प्रकल्प प्रमुख दीपक छिब्बा,व्यव्थापक देवीदास शिंदे, समन्वयक श्रीकांत जाधव यांनी‘तंबाखू नियंत्रण कायदा-२००३( कोटपा) संदर्भात प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षकांना प्रशिक्षण दिले.

यावेळी तंबाखू, धूम्रपानाचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम तसेच नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या तंबाखू नियंत्रण कायदा- २००३ (कोटपा) ची प्रभावी अंमलबजावणी यावर संबंध हेल्थ फॉऊंडेशनचे प्रकल्प प्रमुख दीपक छिब्बा यांनी मार्गदशन केले. नाशिक प्रमाणेच अमरावती, बीड, वाशीम, सोलापूर, पालघर, रायगड, नवी मुबई या जिल्ह्यातही कोटपा कायदा -२००३ अंतर्गत तंबाखू बंदी मोहिम राबविण्यात येत असून जवळपास हजारहून अधिक लोकांवर कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी दिली.

पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण घेत असलेल्या ८१९ प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षकांनी या कायशाळेत भाग घेतला. तंबाखूजन्य जर्दा,खर्रा आणि सिगारेट-बिडी धुम्रपानाच्या दुष्परिणामांची जाणिव असल्याची कबुली देत आपले कार्यालय, घर तसेच परिसर तंबाखूमुक्त राखण्याचा संकल्प करून तंबाखूमुक्तीची सामूहिक शपथ घेतली.कोटपा कायदा म्हणजे काय ?सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने ( जाहिरात आणि व्यापार विनिमय, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण प्रतिबंध कायदा ) अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- ७ नुसार कोणत्याही शैक्षणिक संन्स्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. कलम- ६ ब नुसार बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. या कायदयानुसार २०० रुपये चलन पावती दंड किव्हा बाल न्याय कायदा २०१५ नुसार १ लाख रुपये आणि ७ वषार्ची शिक्षची तरतूद करण्यात आली आहे. बाल न्याय कायदा कलम ७७ नुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याचे संबंध हेल्थ फाऊंडेशनचे राज्य समन्व्यक श्रीकांत जाधव यांनी संगितले. 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस