सर्वप्रथम कोरोना संक्रमणाच्या बाबतीत आढावा घेण्यात आला. म्युकरमायकोसिस आजाराबाबत वाढत्या रुग्णांची पण काळजी घेण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना करत अशा रुग्णांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे पाठवावे व प्राथमिक उपचारासाठी त्यांना औषधे उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांमध्ये लसीकरण अधिकचे व्हावे म्हणून जनजागृती होणे गरजेचे असून स्थानिक गाव कमिटीला बरोबर घेऊन गावातील व परिसरातील नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पवार यांनी दिंडोरी तालुक्यात पाणीटंचाईची सद्य:स्थिती जाणून घेतली व टंचाईच्या ठिकाणी टँकर्स उपलब्धता करून देण्याची सूचना केली. खतांबाबतही आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीनंतर पवार यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांची विचारपूस केली. सदर बैठकीस प्रांत संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, श्याम मुरकुटे, भाजपा नेते प्रमोद देशमुख, सरपंच योगेश बर्डे आदी उपस्थित होते.
कोरोनासह तौक्ते वादळाच्या नुकसानीचा खासदारांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:15 AM