इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नाही
१)महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती असतांना महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत, राजकीय घराण्यात मोठी लग्न समारंभ पार पडत आहेत तसेच केंद्र सरकारच्या सर्व परीक्षांही होत आहेत . महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशनही होते. मग एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवरच अन्याक का असा प्रश्न परीक्षार्थींकडून उपस्थित केला जात आहे.
२)महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, विद्यार्थ्यांना पीपीई कीटचे संरक्षण देऊन तसेच विद्यार्थ्यांची वयोमर्यादा अटीत ३ वर्षांची वाढ करुन देण्यात यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
३)एमपीएसतीची परीक्षा यापूर्वी फेब्रुवारी २०१९मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षात परीक्षा घेण्यात आलेली नाही. याच कालावधीत युपीएसची परीक्षा प्रक्रीया होऊन दुसरी पूर्व परीक्षाही झाली. जेईई, नीट, वेगवेगळ्या सीईटी परीक्षाही झाल्या. मग एमपीएससीचीच परीक्षा का होत नाही असा सवाल परीक्षार्थी उपस्थित करीत आहेत.
-
परीक्षा रद्द होण्याची तिसरी वेळ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी (दि.११) परिपत्रक काढून राज्यात कोरोणाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण सोमवारी (दि.१४) वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ गटातील अधिकारी पदासाठी होणारी एमपीएससी परीक्षा आत्तापर्यंत अकरा महिन्यांत तीन वेळा रद्द झाली आहे, सुरुवातीला कोरोनाविषयी भितीचे वातावरण असल्याने ५ एप्रिलला होणारी परीक्षा रद्द झाल्यानंतर ११ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र आरक्षणाच्या प्रश्नामुळे ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती. ती आता १४ मार्चला होणार होती. मात्र कोरोनाचे कारण देत आयोगाने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलली असून आता २१ मार्चला ही परीक्षा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
--
परीक्षेसाठी हॉलतिकटीही दिले गेले होते.
परीक्षेची संपूर्ण तयारी झालेली असताना आणि परीक्षेसाठी हॉल तिटीकटही मिळालेले असताना ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यापूर्वीही अशाचप्रकारे परीक्षा एक दोन दिवसावर असताना परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अशा प्रकारांममुळे उमेदवारांंमध्ये संभ्रस्वस्था निर्माण होऊन त्यांचा वारंवार हिरमोड होत आहे.
कोट-१
परीक्षा होणे अवश्यक होते, युपीएससीने कोरोनाचा प्रभाव असताना परीक्षा घेतल्या .मग एमपीएससीलाच काय अडचण आहे असा प्रश्न परीक्षार्थींना पडला आहे, परीक्षेची संपूर्ण तयारी केली होती. मात्र अशा प्रकारे परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असल्याने परीक्षार्थी तणावात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
-वैशाली सूर्यवंशी, परीक्षार्थी
कोट-२
परीक्षा पुढे ढकलल्याने तणावाची परीस्थीती निर्माण झाली आहे. कोरोना काळात अन्य परीक्षा होत असतील, तर एमपीएससीचीच परीक्षा का होत नाही? हा अनाकलनीय प्रश्न झाला आहे. अशा प्रकारे वारंवार परीक्षा पुढे ढकलून शासन रोजगारनिर्मितीचे धोरण कसे साध्य करणार याचा विचार होणे आवश्यक आहे. आता आपण कोविडसोबत जगायला शिकलो आहोत त्यामुळे नियोजित वेळेत परीक्षा व्हायला हवी होती.
- धनंजय राऊत, परीक्षार्थी
कोट- ३
युपीएससी देशभरात परीक्षा घेत असतानाही दोन परीक्षा झाल्या, त्याचप्रमाणे जेईई, नीट सारख्याही परीक्षा कोविडमध्येच झाल्या, असे असताना केवळ एमपीएससीच वारंवार पूढे का ढकलली जात आहे. जवळपास दोन वर्षांपासून एमपीएससीची परीक्षा झालेली नाही. परीक्षा व पदस्थापनेचा कालावधी जवळपास दोन वर्षाचा आहे. असा विचार केल्यास परीक्षार्थी उमेदवारांचे चार वर्षाचे नूकसान झाले आहे.
- अश्विनी चिताळकर, परीक्षार्थी